बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

भारताचा ३०० अब्ज डॉलरचा [एफडीआयचा] टप्पा पार - ८ डिसेंबर २०१६

                                                                                   भारताचा ३०० अब्ज डॉलरचा [एफडीआयचा] टप्पा पार - ८ डिसेंबर २०१६
* एप्रिल २००० ते सप्टेंबर २०१६ या काळात ३०० अब्ज डॉलरच्या विदेशी गुंतवणुकीचा [ एफडीआय ] टप्पा भारताने पार केला. सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताची विश्वासार्हता त्यामुळे सिद्ध झाली. 

* या काळात ३०% एफडीआय मॉरिशस मार्गे आला. एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या काळात १०१ अब्ज डॉलर थेट गुंतवणूक भारतात आली. सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन आणि अमेरिका नेदरलँड्स यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक प्राप्त झाली. 

* फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन यांच्या मते धोरणात्मक चौकटीचे शिथिलीकरण तसेच मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आणि स्किल इंडिया, यासारखे उपक्रम आणि स्पर्धात्मकतेत झालेली वाढ यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी भारताला प्राधान्य दिले आहे. 

* CII च्या मते जागतिक अर्थव्यव्यस्था अस्थिर असताना भारतीय अर्थव्ययवस्था स्थिर आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भारताकडे गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून पाहत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.