शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

डिजिटल व्यवहारासाठी केंद्र सरकारचे BHIM - भिम अँप सादर - ३१ डिसेंबर २०१६

डिजिटल व्यवहारासाठी केंद्र सरकारचे BHIM - भिम अँप सादर - ३१ डिसेंबर २०१६

* केंद्र सरकारने कॅशलेस इकोनॉमीसाठी BHIM - भिम नावाचे पेमेंट अँप सादर केले आहे BHIM [ Bharat Interface For Money  चा अर्थ होतो भारत इंटरफेस फॉर मनी असा होतो. भिम अँपच आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [NPCI] ने हे अँप तयार केले आहे.

* नवी दिल्लीत डिजिटल मेला या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भीम अँप सादर केले आहे. या अँपमुळे गरिबांना व इतर सर्वाना व्यवहार करणे सोपे होणार आहे. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येणार आहे. एवढंच नाही तर हे अँप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता होईल.

[ भिम अँप कस वापरणार ]

* अँड्रॉइड स्मार्टफोनवर भीम अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.

* त्यानंतर तुमच बँक खाते आणि त्यासोबत युपीआय पिन तयार करा [ हा पर्याय अप डाउनलोड करतानाच विचारला जातो. तुमचा मोबाईल नंबर हाच पेमेंट ऍड्रेस असेल.

* मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर भिम अँपचा वापर करता येणार आहे. इंग्रजी आणि हिंदी ह्या भाषेत हे अँप सध्या उपलब्द आहे.

* भिम अँपद्वारे युझर्स पैसे पाठवू शकतात. किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेवूही शकतात.

* MMID व IFAC कोडच्या माध्यमातून नॉन युपीआय बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे पाठवता येऊ शकतात.

* यासाठी अँपमध्ये इंग्रजीत सेंड किंवा रिसिव्ह असा पर्याय देण्यात आला आहे.

* भिम अँपमध्ये देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेचा समावेश आहे तसेच प्रमुख खाजगी बँकेचा समावेश करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.