मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

राज्य सरकार आधार कायदा आणणार - २०१६

राज्य सरकार आधार कायदा आणणार - २०१६

* राज्य शासनाच्या एकत्रित निधीतून राबविण्यातून येत असलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचे वित्तीय लाभ अथवा सेवा प्राप्त करून घेण्यासाठी आता लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी आधार हाच एक एकमेव निकष निश्चित केला जाणार असून, त्यासाठी सर्वसमावेशक काय
दा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे.

* केंद्र सरकारने मार्च २०१६ मध्ये असा कायदा करून केंद्र सरकारचे ३६ हजार ५०० कोटी रुपयाची बचत झाली. त्यामुळे याच धर्तीवर असा कायदा आणणार आहे.

* राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या अशा एकूण अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. अशा एकूण १६१ योजना असून, तसेच राज्यात १० कोटी ९६ लाख म्हणजे जवळपास ९२ टक्के लोकांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली आहे. तर पुढे सर्व योजना आधार कार्डशी लिंक करण्यात येतील DBT मार्फत पैसे हस्तांतरित केले जातील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.