मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

राज्यात ३० हजार गावात डिजिटल बँकिंग प्रकल्प

राज्यात ३० हजार गावात डिजिटल बँकिंग प्रकल्प

* राज्य सरकारने ३० हजार गावात [ आपले सरकार ] नावाने केंद्रातून डिजिटल बँकेची सुविधा देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून तो नवीन वर्षात लागू पडेल.

* मुख्य सचिवांनी कॅशलेस बँकीग कामकाजासाठी सोमवारी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गा
वात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम केंद्रात आपले सरकार उपक्रम सुरु करण्याचा आदेश दिला.

* या प्रकल्पामध्ये जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासी दाखला प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी व व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, याशिवाय रेल्वे बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बँकिंग सेवा, ई कॉमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हफ्ते, पासपोर्ट, वीजबिल भरणे, टपाल विभागाच्या सेवा इत्यादी कार्ये या योजनेतून होऊ शकतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.