मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

पतंजली आता दुग्ध व्यायसायात उतरणार - २०१६

पतंजली आता दुग्ध व्यायसायात उतरणार - २०१६

* डेअरी उद्योगाची देशात तीन लाख कोटींची उलाढाल आहे. नागपूरपाठोपाठ पतंजली उद्योग समूहाने नगरमध्ये बस्तान बसविले आहे. पतंजलीने आता दुग्ध व्यवसायात उडी घेतली असून नगर जिल्ह्यातील खडकफाटा तालुका नेवासे येथे कंपनीचा पहिला दूध प्रकल्प सुरु होत आहे.

* त्याकरिता त्यांनी राज्यात सर्वाधिक दूध असलेल्या नगर जिल्ह्याची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २५० कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. शुद्ध प्रतीच्या देशी गाईच्या निर्मितीसाठी २५० कोटीचे ५० वळू ब्राझीलवरून आयात केले असून जागा मिळाल्यावर नेवाशात गोशाळा सुरु करण्यात येणार आहे.

* चार जिल्ह्यांना मध्यवर्ती ठिकाणी खडकफाटा हे नगर व औरंगाबाद महामार्गावर आहे. त्या ठिकाणाहून शिर्डी विमानतळ, नगर - औरंगाबाद रस्ता, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटकाशी जोडणारे महामार्ग, यासाठी लासूर स्टेशन जवळ असल्याने डेअरी उत्पादनाची वाहतूक करणे सोपे जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.