मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

५०० आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार - भारतीय रिझर्व्ह बँक २०१६

५०० आणि १००० रुपयाच्या नोटा रद्द ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार - भारतीय रिझर्व्ह बँक २०१६
* काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टचार व अर्थव्यवस्थेला खिळखिळ्या करणाऱ्या तीन प्रमुख गोष्टी उच्चाटन करण्याचा उपाय म्हणून ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा क्रांतिकारी व धाडसी निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केला. 

* सामान्य लोकांची अडचण होऊ नये यासाठी ५०० व १००० रुपयाच्या नोटा ९,१०,११ नोव्हेंबर रोजी म्हणजे ७२ तासासाठी पुढील ठिकाणी स्वीकारल्या जातील. 

* सरकारी बससेवेच्या तिकीट खिडक्या, विमान कंपन्यांचे तिकीट काउंटर, सरकारी पेट्रोलपंप, गॅसपंप, केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत सहकारी ग्राहक संस्था, रेल्वे तिकीट आरक्षण खिडक्या या ठिकाणी ह्या नोटा स्वीकारण्यात येतील. 

* ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनात राहणार नाहीत. नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेण्यासाठी १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर अशी ५० दिवसांची मुदत असेल. 

* बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी रकमेची कोणतंही मर्यादा असणार नाही व एक व्यक्ती एका वेळी कितीही नोटा जमा करून बदलून घेऊ शकतो. 

* ५०० व २००० हजार रुपयाच्या नव्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणण्यात येतील. या नव्या नोटा जसजशा पुरेशा संख्येने उपलब्द होतील तशा त्या जनतेला उपलब्द करून देण्यात येईल. 

* ९ नोव्हेंबर रोजी देशातील सर्व बँक आणि एटीएमचे व्यवहार बंद राहतील. तसेच १० नोव्हेंबरला काही ठिकाणची एटीएम बंद राहतील. 

* ज्यांना या ५० दिवसाच्या मुदतीत बँकेतून नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना कोणत्याही बँकेत, मुख्य पोस्ट ऑफिस आधार कार्ड, पॅन कार्ड, दाखवून कोणताही ओळख पटवून देणारा पुरावा ३१ मार्च २०१७ पर्यंत या नोटा बदलून घेता येतील. 

* १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या काळात नोटा बदलून घेण्यासाठी चार हजार रुपये हि मर्यादा राहील. तसेच २५ ते ३० नोव्हेंबर या काळात ही मर्यादा वाढविण्यात येईल. 

* ज्यांना काही कारणाने ३० डिसेंबर पर्यांतही वरीलप्रमाणे नोटा बदलून घेणे शक्य होणार नाही त्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या विहित कार्यलयात जाऊन त्या बदलून घेता येतील. मात्र त्या ठिकाणी त्यांना एक डिक्लेरेशन फॉर्म भरून दयावा लागेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.