बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

महाराष्ट्र राज्यात महावितरणची अभय योजना चालू - २०१६

महाराष्ट्र राज्यात महावितरणची अभय योजना चालू - २०१६

* थकीत देयकामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांना दिलासा देणारी अभय योजना मंगळवरपासून सुरु झाली. या योजनेत कृषिपंपधारक आणि सार्वजनिक नळ योजना वगळता सगळ्या ग्राहकांचा समावेश आहे.

* सहा महिन्यासाठी म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल या काळात ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यातील ग्राहकांकडे तीन हजार २०० कोटीची थकबाकी आहे.

* अभय योजनेच्या पहिल्या तीन महिन्यात थकबाकीची भरल्यास व्याज व विलंब आकाराची १००% रक्कम माफ होईल. तीन ते सहा महिन्यात मूळ थकबाकी आणि व्याजाची २५% रक्कम भरल्यास ७५% व्याज व विलंब माफ होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.