सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

आता दिल्ली भारताची आर्थिक राजधानी - २०१६

आता दिल्ली भारताची आर्थिक  राजधानी - २०१६

* ऑक्सफर्ड इकोनॉमिकसने केलेल्या एका जागतिक अभ्यास सर्व्हेनुसार ही बाब समोर आली असून या संस्थेने जगातील २०० देश आणि १०० महत्वाची शहरे यांचा एकत्रित अभ्यास करून सांगितले की दिल्लीने मुंबईला मागे टाकत आर्थिक निकषाच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

* या संस्थेनुसार मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, भिवंडी आणि पनवेल म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्र MMR यांचा विचार करण्यात आला असून मुंबईची क्रयशक्ती ३६८ अब्ज डॉलर एवढी आहे. तर दिल्लीसह गुडगाव, फरिदाबाद, नोएडा, गाझियाबाद म्हणजेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणजेच NCR यांची क्रयशक्ती ३७० अब्ज डॉलर एवढी आहे. यामुळे मुंबई दिल्लीच्या मागे पडले. 

* ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स आर्थिक भविष्यानुसार २०३० मध्ये ही दोन्ही शहरे वरच्या क्रमांकावर झेप घेतील सध्या दिल्ली ३० व्या व मुंबई ३१ व्या क्रमांकावर आहेत. तर २०३० मध्ये दिल्ली ११ व्या व मुंबई १४ व्या क्रमांकावर येतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.