गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

जिएसटीचे दर निश्चित - अर्थमंत्री अरुण जेटली

जिएसटीचे दर निश्चित - अर्थमंत्री अरुण जेटली 

* जीएसटीचे दर अखेर निश्चित झाले असून, गुरुवारी ५, १२, १८ आणि २८ टक्के अशा ४ स्तराच्या कराला जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिली.

* जिएसटी १२% व १८% हे दर सर्वसाधारण व नियमित असतील. ग्राहक महागाई दर व महागाई ज्यांचा परिणाम होतो. अशा ५०% उत्पादनावर जीएसटी नसेल. हा निर्णय एकमताने झाला. नवा कायदा वेळेत चालू होईल.

* संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या १४ दिवस आधी जिएसटी परिषदेची २ दिवसांची बैठक जेटलींच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सुरु झाली.

* उत्पादनात अग्रेसर महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, काही वर्षे उत्पन्नात तोटा सहन करावा लागेल.

* नव्या करामुळे ज्या राज्यांना जे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपयाचा विशेष निधी राखून ठेवला आहे.

* या करामुळे तंबाखू उत्पादने, महागड्या कार्स, शीत पेये, पान मसाला, आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू उत्पादनावर भरभरक्कम २८% जीएसटी करआकारणी होईल.

* १ एप्रिल २०१७ पासून जीएसटीचा अंमल सुरु होईल. ज्या वस्तुंना व उत्पादनांना खप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यासाठी ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागू नये. यासाठी त्यावर जिएसटी आकारणी अवघ्या ५% दराने होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.