गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

देशात एलजी हा सर्वात आकर्षक ब्रँड - २०१६

देशात एलजी हा सर्वात आकर्षक ब्रँड - २०१६  

* विविध कंपन्यांच्या ब्रँडचे देशभरात सर्वेक्षण करणाऱ्या [ टीआरए ] या अग्रगण्य कंपनीने १० हजार ब्रॅंड्सचा अभ्यास करून देशभरातील आकर्षक करणाऱ्या २७६ विभागातील एक हजार ब्रॅंड्सची उतरत्या क्रमाने मांडणी जाहीर केली.

* सर्व विभागाच्या एकत्रित यादीत [ एलजी ] हा ब्रँड देशात सर्वाधिक आकर्षक ब्रँड ठरला आहे. त्या खालोखाल अनुक्रमे सोनी, सॅमसंग, होंडा, हे ब्रँड आकर्षक ठरले आहे. पूर्णतः भारतीय उद्योग समूह असलेल्या बजाजने यंदाच्या यादीत सहावे स्थान मिळविले आहे.

* तसेच टाटा सातव्या, मारुती सुझुकी आठव्या, एअरटेल नवव्या आणि नोकिया दहाव्या स्थानावर आहे. तर मुद्रित माध्यमांच्या विभागात समाविष्ट असलेल्या १४ ब्रॅंड्समध्ये लोकमत अग्रस्थानी आहे. त्याखालोखाल अनुक्रमे हिंदुस्थान टाइम्स, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, आऊटलूक, दैनिक भाष्कर नवभारत, अमर उजाला हे माध्यमांचे ब्रँड आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.