शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

जेम्स वेब जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बीण तयार - नासा

जेम्स वेब जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बीण तयार - नासा   

* अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासा ने जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बीण तयार करण्याचा आपला महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. जेम्स वेब असे या दुर्बिणीचे नाव आहे. ही दुर्बीण मागील २६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या हबल या दुर्बिणीची जागा घेणार आहे.

* या दुर्बिणीद्वारे परग्रहावरील जीवसृष्टीचा वेध घेणे शक्य होणार आहे. असा काही शास्त्रज्ञानी दावा केला आहे. जेम्स वेबची निर्मिती पूर्ण झाली असून, तिच्या काही चाचण्या होणे अद्याप बाकी आहे. या दुर्बिणीचा मुख्य भाग असल्या '' प्रायमरी मिरर '' वर नुकताच अंतिम हात फिरविला आहे.

* तब्बल २० वर्षाच्या प्रयत्नानंतर ही दुर्बीण तयार करण्यात आली. नासा ने युरेपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडाच्या अवकाश साहाय्याने तयार केली आहे.

* नासाच्या हबल या दुर्बिणीपेक्षा शंभरपट अधिक जेम्स वेब ची क्षमता असून हबलपेक्षा ही तिप्पट मोठी आहे. म्हणूनच या दुर्बिणीला सुपर हबल असे टोपण नाव मिळाले आहे.

* जेम्स वेबची वैशिष्ट्ये - १०० पट हबलपेक्षा सक्षम, ३ पट हबलहून मोठी, १८ षट्कोनी आरसे, ४६ पौंड प्रत्येक आरशाचे वजन, सूर्यकिरणांना सामना करू शकणारे अत्युच्य दर्जाचे कॅमेरे, टेनिसच्या मैदानाच्या आकाराची पाच थरांची ढाल दुर्बिणीचे रक्षण करण्यासाठी सज्ज. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.