गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू - २०१६

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू - २०१६

* तामिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तथापि १ नोव्हेंबरपासून ही राज्येही पटलावर आली आहेत. या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार आहे.

* केवळ ११ राज्यात या कायद्याची अंमलबजावणी होत होती. तेथेही १ नोव्हेंबरपासून हा कायदा लागू झाला. २०१३ मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्याअंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा ५ किलो धान्य पुरविणार आहे.

* ७१% शिधापत्रिका आधार कार्डशी जोडण्यात आल्या असून, उर्वरित शिधापत्रिकाही लवकरच जोडल्या जातील. शिधापत्रिका आधार कार्डशी
जोडण्याच्या प्रक्रियेमुळे २.६२ कोटी शिधापत्रिका वगळल्या गेल्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.