बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

राज्यात १९८४ सालानंतर तलाठी पदभरती - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात १९८४ सालानंतर तलाठी पदभरती - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

* गावपातळीवर महसूल विभागाच काम अधिक चोखपणे व सक्षमतेने होण्यासाठी तब्बल १९८४ सालानंतर म्हणजेच ३२ वर्षांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे.

* राज्यभरात एकूण ३०८४ नव्या तलाठ्यांची भरती होणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या निर्णयाने  राज्यातील ६ गावांना एक तलाठी मिळेल. राज्यात सध्या एकूण १२३२७ तलाठी सज्जे आहेत. त्यात वाढ केल्यानंतर १५४११ तलाठी सज्जे होतील.

* १९८४ सालानंतर पहिल्यांदाच सज्जे यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. २०१७ च्या सप्टेंबरमध्ये ३०८४ तलाठी पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी तयारी करावी.

* विभागनिहाय तलाठी मंजूर पदे - कोकण - ७४४, नाशिक - ६८९, पुणे - ४६३, औरंगाबाद - ६८५, नागपूर - ४७८, अमरावती - २५. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.