शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

प्रवेश कर लावण्याचा अधिकार आता राज्यांना

प्रवेश कर लावण्याचा अधिकार आता राज्यांना

* आपल्या भूप्रदेशात येणाऱ्या मालावर प्रवेश कर लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे, असा निर्णय सर्वोच न्यायालयाने दिला आहे. 

* ७ विरुद्ध २ अशा बहुमताने दिलेल्या या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश कारासंबंधी राज्य सरकारांचे कायदे घटनात्मक दृष्टया वैध ठरवले आहे. 

* अन्य राज्यातून आपल्या प्रदेशात येणाऱ्या मालावर कर लादण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे. पण हा कर लावताना वस्तूमध्ये भेदभाव होता कामा नये. 

* याचाच अर्थ राज्य सरकार आपल्या राज्यात बनविण्यात आलेल्या एखाद्या वस्तूवर कर लावत असेल, त्यापेक्षा अन्य राज्यांनी अधिक कर लावू नये. 

* आपल्या राज्यातील वस्तूच्या तुलनेत अन्य राज्यातील वस्तूवर अधिक कर लावण्याचा अधिकार राज्यांना घटनेने दिलेला नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.