बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

स्मार्टफोन मध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश अनिवार्य - केंद्र सरकार

स्मार्टफोन मध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश अनिवार्य - केंद्र सरकार 

* येत्या १ जुलै २०१७ पासून भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करणं अनिवार्य असेल. केंद्र सरकारने यासंबंधी एक सर्क्युलर जारी केले आहे.

* इंडियन स्टॅंडर्ड ऍक्टनुसार कलम १० नुसार भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषांचा समावेश असेल. आणि ते बंधनकारक असेल.

* सरकारच्या या नवीन नियमानुसार सर्व मोबाईल कंपन्यांना स्मार्टफोन मजकूर वाचण्यासाठी भारतीय भाषांचा सपोर्ट द्यावा लागणार आहे. नवीन नियमानुसार मोबाईलमध्ये मेसेज वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी इंग्रजी, हिंदी, आणि अन्य प्रादेशिक भाषांचा पर्याय असेल.

* केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे. यामुळे देशातील इंग्रजी न बोलणाऱ्या जवळपास १०० कोटी लोकांना मोबाईलचा वापर करता येणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

* भारतीय भाषांमध्ये सपोर्ट आल्यामुळे ई गव्हर्नसन्स ट्रान्झॅक्शन, ईकॉमर्स बिझिनेस यांचा वापर व चालना मिळू शकेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.