बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

देशातील पहिल्या आधुनिक औद्योगीक स्मार्ट सिटी ऑरिकला वित्तीय मान्यता - २०१६

देशातील पहिल्या आधुनिक औद्योगीक स्मार्ट सिटी ऑरिकला वित्तीय मान्यता - २०१६

* औरंगाबाद येथे विकसित करण्यात येत असलेल्या ऑरिक सिटीला आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. त्यातील सरकारतर्फे ६०० कोटींचा रुपयाचा पहिला टप्पा आपल्याला मिळाला. तसेच ८ हजार कोटीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल.

* फडणवीस यांच्या मते देशातील सर्वात पहिली आधुनिक औद्योगिक स्मार्टसिटी '' ऑरिक ''  या नावाने आपण तयार करत आहोत. या सिटीत टप्प्याटप्प्याने ७० हजार कोटीची गुंतवणूक होईल.

* या सिटीतून ३ लाख लोकांना रोजगार मिळेल. पहिल्या टप्प्यात शेंद्रा नोडचे काम ऑकटोबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. पूर्ण प्रकल्प २०२२ साली पूर्ण होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.