मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

देशात व्यवसाय सुलभतेसाठी आंध्रप्रदेश देशात प्रथम - २०१६

देशात व्यवसाय सुलभतेसाठी आंध्रप्रदेश देशात प्रथम - २०१६

* देशाती व्यवसाय करण्यासाठी सर्वात सुखकर वातावरण निर्माण करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये आंध्रप्रदेश राज्याने अग्रस्थान मिळविले आहे. तर तेलंगणा राज्याने द्वितीय क्रमांक मिळविला. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या दोन राज्यामध्ये अग्रस्थानासाठी तीव्र चुरस होती.

* व्यवसाय पूरक वातावरण तयार करण्याच्या या मोहिमेमध्ये गुजरात राज्याची घसरण झाल्याचे दिसून आले. या यादीमध्ये गुजरातला तिसरे स्थान मिळाले. छत्तीस
गढ राज्याचे चौथे स्थान कायम राखले आहे. छत्तीसगढ नंतर या यादीमध्ये अनुक्रमे मध्यप्रदेश, हरियाणा, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, आणि महाराष्ट्र राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र या यादीमध्ये तब्बल १० वा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

* कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि बिहार या राज्यांना या यादीत उद्योन्मन्मुख नेतृत्व असे संबोधण्यात आले आहे. तर हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांची कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्यक आहे. औद्योगिक विकास विभाग पोलिसदलात व जागतिक बँकेच्या एकत्रित प्रयत्नातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.