बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

चीनमध्ये ५G दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरु - २०१६

चीनमध्ये ५G दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरु - २०१६

* जगातील सर्वाधिक मोबाईल वारकर्ते असलेल्या चीनमध्ये ४G च्या पुढची पिढी ५G च्या चाचण्या १०० शहरात सुरु केल्या आहेत. जगात दूरसंचार क्षेत्रात पुढे राहण्यासाठी चीनचे हे पाऊल आहे.

* ५G दूरसंचार नेटवर्क ४G च्या २० पट अधिक गतिमान आहे. तसेच त्याच्यात डाटा लॉस होण्याचे प्रमाण कमी आहे.

* ५G सोबत बहुअँटेना यंत्रणेची चाचणी घेण्यात येत आहे. एकाच वेळी अधिक वापरकर्ते या यंत्रणेद्वारे हाताळता येऊ शकतात. त्यामुळे डाटा वापराची क्षमता वाढते.

* चीन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञानानुसार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चीन जगातील सर्वात मोठी ४G बाजारपेठ आहे. चीनमध्ये २०१५ च्या अखेरीस १.३ अब्ज वापरकर्ते होते. यापैकी ३०% ४G ग्राहक होते.

* ५G नेटवर्क द्वारे २० GB प्रतिसेकंद इतकी गतिमान सेवा दिली जाऊ शकते. तर ४Gची गती १ GB प्रतिसेकंद इतकीच आहे. यावरून ५G ची कल्पना येऊ शकते.

* ४G जिची लॅन्टासी १० मिलिसेकंद आहे तर ५G जिची १ मिलिसेकंद आहे. म्हणजेच एखाद्या ऍपला क्लिक केल्यानंतर प्रत्युत्तर येण्यासाठी जो वेळ लागतो. त्याला लॅन्टासी असे म्हणतात.

* आंतरराष्ट्रीय पातळीवर ५G चे निकष ठरविण्यात आले नाही. संयुक्त राष्ट्राचा भाग असलेल्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या अपेक्षेनुसार ५G जिचे निकष ठरल्यानंतर २०२० मध्ये त्या संबंधीचे नेटवर्क उभारणी सुरु होऊ शकेल.

* ५G तंत्रज्ञानास आयएमटी -२०२० असेही म्हटले जाते. जगातील दूरसंचार उद्योगाला ५G साठी एकच निकष असावा असे वाटते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.