शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

राज्यातील २० पर्यटन स्थळांचा विकास - केंद्र व राज्य सरकार

राज्यातील २० पर्यटन स्थळांचा विकास - केंद्र व राज्य सरकार 

* दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशभरातील ६०० पर्यटन स्थळांची निवड करून त्यांचे प्रकल्प सादर केले. यात राज्यातील २० पर्यंटन स्थळांचा समावेश आहे.

* भारतात पर्यटन क्षेत्र सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून राज्यातील पर्यटन स्थळ प्रकल्पांची संख्या जास्त असल्याने असे पर्यटन आयुक्त नायर यांनी सांगितले.

* राज्यातील अनुक्रमे पर्यटन स्थळ चिखलदरा, नागपूर, नवेगाव खैरी, नंदुरबारमधील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा, नंदुरबारचा तोरणमाळ परिसर, लोणार येथील अजिसपूर, सिंधुदुर्ग येथील मिठबाव, निवतीचा किनारा, रत्नगिरी हरणाई किल्ला, रायगड किल्ला आणि परिसराचा विकास, रायगडमध्येच काशीद समुद्रकिनारा आणि परिसर, सुरेखार परिसर, ठाण्यात वसईचा किल्ला, पालघर येथील शिरगाव, मुबंईत कलाग्राम नावाचे प्रदर्शन, अशी २० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.