रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

ईबीसी सवलत आता ६ लाख - राज्य सरकार

ईबीसी सवलत आता ६ लाख - राज्य सरकार 

* आर्थिकदृष्ट्या मागास सवलतीची [ ईबीसी ] मर्यादा सहा लाखापर्यंत करण्याचा राज्यशासनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

* उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाजवळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

* या योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

* विद्यार्थ्याला किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहे. या योजनेसाठी वार्षिक उतपन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.