रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

नागपूरमध्ये रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना सुरु होणार - २०१६

नागपूरमध्ये रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना सुरु होणार - २०१६

* नागपूर मेट्रो रेल्वेसाठी चीनची ' चायना रेल्वे रोलिंग स्टोक कार्पोरेशन ' सीआरआर ही कंपनी डबे पुरवठा करणार असून या कंपनीचे बुटीबोरी एमआयडीसी परिसरात कार
खाना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

* यासंदर्भात शनिवारी महाराष्ट्र सरकार आणि चीनची कंपनी यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी करार केला आहे.

* सीआरआर ही कंपनी नागपुरात बुटीबोरी एमआयडीसीमध्ये २५० हेक्टर जागेवर १५०० कोटी रुपये खर्च करून डबे निर्मिती कारखाना सुरु करणार आहे.

* महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. सध्या देशात विविध शहरात मेट्रो रेल्वेचे प्रकल्प सुरु आहेत. नागपुरात हा प्रकल्प सुरु झाल्याने चीनच्या कंपनीला भारतातील आणि भारताबाहेर चांगली बाजारपेठ उपलब्द होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.