गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

भारत रशिया नैसर्गिक वायू पाईपलाईन करार - २०१६

भारत रशिया नैसर्गिक वायू पाईपलाईन करार - २०१६

* सैबेरियातून नैसर्गिक वायू वाहून नेण्यासाठी पाईपलाईन वाहून नेण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात करार झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५ अब्ज डॉलर एवढा खर्च येणार आहे.

* या पाईपलाईनमुळे रशिया व भारत रशि
यन गॅस ग्रीड यांच्याशी जोडला जाणार आहे. गॅस वाहून आणणारी ही पाईपलाईन हिमालयातून उत्तर भारतात येईल व ती ४५०० ते ६००० किमी एवढी लांब असेल.

* सर्वाधिक ऊर्जा वापरात भारताचा क्रमांक तिसरा लागतो, त्यामुळे भारताची ऊर्जेची भूक जास्त आहे. या पाईपलाईनमधून गॅस वाहून नेण्यासाठी प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटसाठी १२ डॉलर खर्च येईल.

* भारताची [ इंजिनिअर्स इंडिया ली - ईआयएल ] आणि रशियाची गॅस कंपनी गॅझप्रोम यांच्यात या प्रकल्पासाठी करार झाला आहे. तसेच ओनजिसी विदेश ली, जीआयल इंडिया, पेट्रोनेट. एलएनजी ली इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.