शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

बर्म्युडा ट्रँगल चे रहस्य उलगडले - २०१६

बर्म्युडा ट्रँगल चे रहस्य उलगडले - २०१६

* संशोधकांना दशकांपासून न उलगडलेले अटलांटिक महासागरातील '' बर्म्युडा ट्रँगल '' चे रहस्य अखेर समोर आले. आतापर्यंत या भागात ७५ पेक्षा जास्त विमाने व १०० पेक्षा जास्त जहाजे बेपत्ता झाली.

* संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार ' षटकोनी आकाराचे ढग [ हेक्झागॉन क्लाउड ] आणि सोबत वाहणाऱ्या हवेमध्ये एखाद्या बॉम्ब किंवा स्फोटाप्रमाणे शक्ती तयार होते. याचदरम्यान १७० मैल प्रतितास या वेगाने वारेही वाहतात. हे ढग आणि हवा विमान आणि जहाजावर आदल्यामुळे अपघात होत होते.

* ५००,००० किलोमीटर चौरसपर्यंत पसरलेला हा पट्टा गेली अनेक वर्षे कृपासिद्ध होता. हवामान शास्त्रज्ञ यांच्यानुसार हे षट्कोनी ढग स्फोटाप्रमाणे परिस्थिती निर्माण करतात. ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी उध्वस्त होतात. वेगाने वाहणारे वारे ढगांना भेदत जाऊन समुद्राच्या लाटांवर येऊन आदळतात
.

* यामुळे त्सुनामीसाठी उंच लाटा उसळतात. यातून विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.