मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

देशात सर्वाधिक इंटरनेट वायफायचा वापर पाटण्यात - २०१६

देशात सर्वाधिक इंटरनेट वायफायचा वापर पाटण्यात - २०१६ 

* रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देशातील ४०० रेल्वे स्थानकावर मोफत आणि जलद वायफाय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

* रेल्वे स्थानकावर ' रेलवायर ' नावाने मोफत वायफाय सेवा पुरविण्याचे काम गुगल च्या सहकार्याने ' रेलटेल ' ही रेल्वेची उपकंपनी करीत आहे.

* रेलटेलच्या मते देशात वायफायचा सर्वाधिक वापर बिहारची राजधानी पाटणा येथे होतो तर त्यात पोर्नोग्राफी सर्वाधिक पहिली जाते असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

* प्रभू यांनी ही योजना जाहीर केलेले हे बिहारमधील पहिले वायफाय स्टेशन आहे. सध्या ही सेवा एक गिगाबाईट एवढी आहे. कालांतराने याची क्षमता १० गिगाबाईट करण्यात येईल.

* देशात वायफाय सेवा सुरु होणारे मुंबई सेंट्रल हे देशातील पहिले स्टेशन आहे. सर्वाधिक वायफाय वापर करणारे शहरे अनुक्रमे पाटणा, जयपूर, बंगळुरू, नवी दिल्ली, यांचा क्रमांक लागतो.

* तीन वर्षात ४०० रेल्वे स्टेशनवर ही सेवा सुरु केली जाणार आहे. वर्षअखेरीस १०० रेल्वे स्टेशनवर ही सेवा सुरु झालेली असेल. सर्व स्टेशन पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सेवा ठरेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.