मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

मिहान प्रकल्प विकास व सद्यस्थिती - २०१६

मिहान प्रकल्प विकास व सद्यस्थिती - २०१६

* मंजुरी - महाराष्ट्र सरकारने ४ जानेवारी २००२ साली मिहान प्रकल्पाला मान्यता दिली. आणि त्यासाठी एमएडीसी ही नोडल एजन्सी स्थापन केली. भारत सरकारने जानेवारी २००८ ला महाराष्ट्र सरकारचा मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर कार्गो हब एअरपोर्ट प्रकल्प मंजूर केला.

* मूळ कल्पना - या प्रकल्पाची मूळ कल्पना कार्गो हब अशी आहे. या प्रकल्पाचे दोन भाग असून पहिला कार्गो हब व दुसरा आर्थिक विशेष क्षेत्र, या प्रकल्पाचा आत्मा कार्गो हब आहे. त्यासाठी किमान दोन धावपट्या आवश्यक आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खाजगीकरणाच्या माध्यमातून अद्ययावत आणि अत्याधुनिकरण करणे यासाठी वैश्विक निविदा काढण्यात आल्या आहेत.

* प्रकल्प एजन्सी - राज्य सरकारची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी प्रकल्पाची नोडल एजन्सी आहे. मिहान देशातील असा प्रकल्प आहे की ज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी आणि कार्गो हब आहे. शिवाय विमानतळा शेजारी उत्पादन होणारे विशेष आर्थिक क्षेत्र.

* नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ' मल्टी मोडल इंटरनॅशनल हब अँड एअरपोर्ट ऑफ नागपूर [ मिहान MIHAN ] असा हा प्रकल्प आहे. प्रकल्प प्रारंभ होऊन १४ वर्षे झाली. त्यासाठी ४२००  हेक्टर जमीन संपादित करण्यात आली.

* प्रकल्पाची वैशिष्ट्ये - मिहान प्रकल्पाचे ठिकाण भोगौलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी आहे. येथून रस्ता, हवाईमार्ग, रेल्वे मार्ग सहज उपलब्द आहेत. अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळालगत बहूउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र असलेला हा एकमेव प्रकल्प आहे.

* मिहान प्रकल्पाचे प्रमुख दोन भाग आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र आणि नॉन सेझ. अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय मिहान प्रकल्प ४२०० हेक्टरमध्ये आहे. यातील १,३६० हेक्टर जागा विमानतळासाठी व दोन हजार हेक्टर जागा सेझसाठी आहे आणि अधिक निवासी संकुले, वाणिज्यिक इमारत, शॉपिंग सेंटर, गोदामे विकसित करण्यात येतील.

* सेझमधील गुंतवणूक - बीपीएस, टाल आणि लुपिन फार्मा यांनी निर्यात सुरु केली आहे. तसेच एअर इंडिया - बोईंगचा एमआरओ सुसज्ज आहे. टीसीएस सुरु झाले आहे. लुपिन फार्मा यांनी २५० कोटी गुंतवणूक केली आहे. एमएडीसी आणि गुंतवणूकदरांनी मिळून सुमारे ४५०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

* कंटेनर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि [ काँकर ] मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येत आहेत.

* पतंजली फूड पार्क, धीरूभाई अंबानी एअरोस्पेस, शापूरजी पालनजी अँड कंपनी लि, महिंद्रा लाइफस्टाइल, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस लिमिटेड, आयआयएम साठी १४३ एकर जागा, एम्ससाठी १५० एकर जागा, शासकीय अभियांत्रिकी साठी १२ एकर जागा, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल यांना २५ एकर जागा, देण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.