शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

दुग्धोत्पादक जनावरांना आता आधार क्रमांक - केंद्रीय पशुधन विभाग

दुग्धोत्पादक जनावरांना आता आधार क्रमांक - केंद्रीय पशुधन विभाग 

* देशातील नागरिकांची ओळख निर्माण करणाऱ्या आधार कार्डप्रमाणेच दूध देणाऱ्या जनावरांनाही ओळख क्रमांक मिळणार आहे.

* पहिल्या टप्प्यात गायी आणि म्हशींना ही ओळख दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय पशुधन विभागाने 'इनाफ - इन्फॉरमेशन नेटवर्क फॉर ऍनिमल प्रॉडक्टव्हीटी अँड हेल्थ ही संगणक प्रणाली विकसित केली आहे.

* गायी म्हशींना दिला जाणारा १२ अंकी क्रमांक एकमेव युनिक असेल. तो दुसऱ्या गायी म्हशींना दिला जाणार नाही. हा रबरी बिल्ला जनावरांच्या कानाला लावला जाईल. या क्रमांकासह पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी जनावरांची नोंद घेतील त्यांच्या भेटीच्या वेळी इनाफ या संगणक प्रणालीत करतील.

* प्रस्तावित १२ अंकी ओळख क्रमांक गायी, म्हशीच्या वंशावळीसह तिची जात, वय, वेत, सद्यस्थिती, आजार, मालकाचा पत्ता नाव, अशी सगळी माहिती या योजनेतून मिळेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.