सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

महाराष्ट्र डिजिटल लॉकर योजनेत देशात प्रथम स्थानी - २०१६

महाराष्ट्र डिजिटल लॉकर योजनेत देशात प्रथम स्थानी - २०१६

* देशातील डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत 'डिजिटल लॉकर' योजनेत देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक घेतला आहे.

* डिजिटल योजनेमुळे महत्वाचे कागदपत्र यांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते. यामुळे आपले कष्ट आणि वेळ वाचतो.

* अवघ्या दीड वर्षात २७ लाख लोक किंवा नागरिक डिजिटल लॉकरचा उपयोग करत आहेत.

* फेब्रुवारी २०१५ साली या योजनेला सुरुवात झाली होती. एकप्रकारे ही सरकारची इलेक्ट्रॉनिक तिजोरीच आहे.

* सध्याचे युग हे डिजिटल युग असल्यामुळे पेपरलेस कामाला प्राधान्य दिले जात आहे. त्यापासून शालेय दाखला, पदवीची प्रमाणपत्रे, महसूल विभागातील दस्तऐवज, आधार कार्ड, मतदानकार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे जपून ठेवणे आणि सहज उपलब्द करणे यामुळे शक्य होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.