गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

चालू घडामोडी २६ ते ७ सप्टेंबर - २०१६

चालू घडामोडी २६ ते ७ सप्टेंबर - २०१६

* आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी विश्वजित यांची निवड झाली आहे ही स्पर्धा माद्रिद या शहरात पार पडणार आहे.

* बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा २०१६ सालचा बंगभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

* व्यापार व उद्योग वाढीसाठी अनुकूल असलेल्या देशांपैकी भारताच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या वर्षी सुधारणा होऊन जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात १६ स्थान वर चढून ३९ व्या स्थानावर आला.

* नवीन जागतिक आर्थिक सर्वेक्षणानुसार मुंबई हे देशातील सर्वात श्रीमंत शहर आहे. अनुक्रमे दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, कलकत्ता, पुणे, चेन्नई, गुरगाव, हे शहरे आहेत.

* २०१६ चा लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक उत्तम सिंग यांना जाहीर झाला आहे.

* देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेले पनवेल शहर १ ऑकटोबर २०१६ पासून महाराष्ट्र राज्यातील २७ वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली.

* स्वच्छता मोहीम अंतर्गत महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याने व पुणे महापालिका यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला.

* केंद्र शासनाच्या स्वछता योजनेत देशातील गुजरात व आंध्रप्रदेश राज्याने पहिली हागणदारीमुक्त राज्ये यांचा प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

* नागपूर जिल्हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित झाला आहे.

* जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकशास्त्र, तर फिजिक्समधील डेव्हिड थोऊलेस, डंकन हेल्डन, मायकल कोस्टरलिडझ यांना, तर रसायनशास्त्राचे नोबेल फ्रान्सचे पियरे सोरेज, ब्रिटनचे फ्रॅसार स्टारडर्ट व नेदरलँडचे बर्नार्ड फेरींगा यांना घोषित झाले आहे.

* ख्यातनाम संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गझल गायक भूपिंदर, भरतनाट्यम नर्तक सी व्ही चंद्रशेखर, यांना २०१६ चे संगीत नाटक अकँडमी पुरस्कार घोषित केले आहे.

* जागतिक बँकेच्या अहवालानूर २०१६-१७ मध्ये भारताचा जिडीपी ७.६ व २०१७-१८ मध्ये ७.७ एवढा राहील.

* चीनमध्ये भविष्यातील ५G या दूरसंचार नेटवर्कच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या.

* भारताने जीसॅट १८ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून दूरसंचार क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

* देशातील पहिले वैद्यकीय पार्क चेन्नई येथे सुरु करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यातून वैद्यकीय क्षेत्रातील उत्पादने निर्माण करून ते कमी किमतीत उपलब्द होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.