रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा - २०१६

                                                                                    नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा - २०१६

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याने सेवा कायद्याहमी अंतर्गत १६३ सेवा ऑनलाईन केल्या असून, आतापर्यंत ३६९ सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. 

* त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल झाल्याने हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा झाला आहे. तसेच महाराष्ट्र हे देशातील पहिले डिजिटल राज्य करण्यात येणार आहे. 

* मुख्यमंत्री यांच्या म्हणण्यानुसार सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व गावे डिजिटल कनेक्टिव्हिटीने जोडण्यात येणार आहे. 

* डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शेतकऱ्यांना हवामान, शेतीमाल डिजिटल मार्केट, रुग्णालये, डिजिटल माध्यमाने जोडले जाणार असल्याने जगभरातील चांगल्या सेवा गावापर्यंत पोचणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.