सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

पॅरिस करार अहवाल - २०१५

पॅरिस करार अहवाल - २०१५

* पॅरिस येथील जागतिक हवामान परिषदेचा समारोप करताना १२ डिसेंबर २०१५ रोजी, अवघ्या जगाने पॅरिस करारास संमती दिली होती. जगातील ५५% प्रदूषणास
कारणीभूत असणाऱ्या ५५ देशांनी याच्यावर सह्या केल्या आहेत. सध्या ४८% प्रदूषण करणाऱ्या अमेरिका, चीन, ब्राझील आदी ६० देशांनी या करारावर सह्या केल्या आहेत.

* भारताने हवामान बदलाविषयक पॅरिस करारावर नुकतीच सही केली आहे. २०३० साली कार्बन उत्सर्जन पातळीत २००५ च्या पातळीपेक्षा ३३ टक्क्यांनी घट करण्याचे तसेच २०४० पर्यंत ४०% वीजनिर्मिती ही अपारंपरिक करण्याचं उद्दिष्ट यात ठरले आहे.

* याचाच एक भाग म्हणून २०२२ पर्यंत १०० गिगावॅट सौरऊर्जा निर्माण करावी लागणार आहे. याकरिता सुमारे २.५ लक्ष कोटी खर्च येईल.

* जागतिक हवामान बदल रोखण्याबद्दल विचारमंथन करणारी २२ वी जागतिक शिखर परिषद मराकेश [ मोरोक्को ] येथे ७ ते १८ नोव्हेंबर या ठिकाणी होणार आहे. याआधी २००९ मध्ये कोपनहेगन या ठिकाणी ही परिषद झाली होती.

[ पॅरिस करारातील ठळक मुद्दे ]

* जगाची तापमानवाढ २ अंश सेल्सियन्सने रोखणे १.५ अंश सेल्सियसपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

* प्रत्येक राष्ट्रांनी कार्बन उत्सर्जन उद्दिष्ट [ इंटेन्टेड नॅशनली डिटरमाइंड काँट्रीब्युशन ] ठरवणे.

* २०२० सालापासून विकसित राष्ट्रे १०० अब्ज डॉलरचा वसुंधरा हरित निधी देतील.

* २०२३ नंतर दर पाच वर्षांनी प्रगतीचा आढावा घेऊन वाटचाल केली जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.