बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

राष्ट्रपतीच्या वेतनात २००% वाढ होणार - वेतन आयोग

राष्ट्रपतीच्या वेतनात २००% वाढ होणार - वेतन आयोग 

* देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्र्पतींना विविध अधिकार दिले आहेत. तर सध्या राष्ट्रपतींना महिन्याला दिड लाख वेतन मिळते.

* देशात सर्वत्र सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारवर आहे. यासंबंधीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जानेवारी २०१६ पासूनची वेतनवाढ राष्ट्रपतींना देण्यात येईल.

* २००८ साली राष्ट्रपतींच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली. २००८ मध्ये राष्टपतीचे वेतन ५० हजारावरून दिड लाख करण्यात आले.

* तर सातव्या वेतन वाढीनंतर राष्ट्रपतींना एकूण ५ लाखाच्या आसपास वेतन मिळणार आहे. तर उपराष्ट्रपती यांना दिड लाखावरून ३ लाख ५० हजार वेतन मिळणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.