मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

चीनच्या [ लॉंग मार्च - २ एफ ] अवकाशयानाचे प्रक्षेपण - २०१६

चीनच्या [ शेंझोऊ ११ - लॉंग मार्च - २ एफ ] अवकाशयानाचे प्रक्षेपण - २०१६

* दोन अंतराळवीरांचा समावेश असलेल्या शेंझोऊ ११ या अवकाशयानाचे चीनने आज यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे.

* हे अवकाशयान दोन दिवसांनी चीनच्या अवकाशात प्रयोगशाळेला जोडले जाणार आहे. येथे हे दोन अंतराळवीर एक महिना थांबणार असल्याने अशा प्रकारची चीनची ही पहिलीच सर्वात मोठी मोहीम ठरणार आहे.

* जिंग हॅपेंग [ वय ५० ] आणि चेंग डोंग [ ३७ ] अशी या दोन अंतराळवीरांची नावे आहेत. '' लॉन्ग मार्च - २ '' या प्रक्षेपकाच्या मदतीने शेंगझोऊ ११ ला अवकाशात सोडण्यात आला.

* जिंग यांची ही तिसरी तर चेंग यांची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे. हे दोघेही अवकाश प्रयोशाळेतील एक महिन्याच्या विविध तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहेत.

* २०२० पर्यंत अवकाशात अवकाशकेंद्र उभारण्याच्या चीनच्या महत्वाकांक्षी मोहिमेतील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी अभिनंदन केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.