मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत केरळचे कक्काथुरुथु बेटाचा समावेश - २०१६

जगातील सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत केरळचे कक्काथुरुथु बेटाचा समावेश - २०१६

* पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळला आणखी एक मानाचा बहुमान मिळाला असून केरळच्या कक्काथुरुथु या बेटाचा समावेश करण्यात आला आहे.

* नॅशनल जिओग्राफिकने ' अराउंड द वर्ल्ड इन २४ अवर्स ' या नावाने पर्यटनातील जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे.

* नॅशनल जिऑग्राफिकने कक्काथुरुथु या बेटाचे अप्रतिम सौन्दर्य कॅमेरात कैद केले आहे. निळेशार पाणी, नारळाची झाडे, यांच्या सानिध्यात बेटावरून सूर्यास्त पाहणे हा आनंददायी अनुभव आहे.

* कोचीपासून जवळ असलेल्या कक्काथुरुतुला पारंपरिक बोटीने जाता येते. हे बेट पक्षिनिरीक्षणासाठी पर्वणी आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.