बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

लैंगिक समानतेच्या सूचित भारत ८७ वा - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम

लैंगिक समानतेच्या सूचित भारत ८७ वा - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 

* वेतनमान आणि शैक्षणिक संधी यांच्यामध्ये असलेल्या लैंगिक समानतेच्या सूचित भारताने १४४ देशांमधून ८७ वे स्थान मिळवले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही सूची सादर केली आहे.

* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ग्लोबल गेंदार गॅप रिपोर्ट सादर केला आहे. भारताने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात असलेली लैंगिक तफावत पूर्णपणे संपुष्टात आणल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* या सूचित आईसलँडने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ फिनलँड, नॉर्वे, स्वीडन असा क्रम लागतो. या सूचित अमेरिका ४५ व्या स्थानी आहे. तर ब्रिक्स देशांपैकी दक्षिण आफ्रिका १५ व्या रशिया ७४ व्या, ब्राझील ७९, चीन ९९ व्या स्थानी आहे.

* आशियायी देशामध्ये अनुक्रमे बांगलादेश ७२, श्रीलंका १००, नेपाळ ११०, मालदीव ११५, भूतान १२१, तर १४४ देशाच्या यादीत पाकिस्तना शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.