गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

मराठवाड्यातील पहिला ड्रायपोर्ट जालना येथे विकसित होणार - राज्य सरकार २०१६

मराठवाड्यातील पहिला ड्रायपोर्ट जालना येथे विकसित होणार - राज्य सरकार २०१६

* जेएनपीटी - अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्या माध्यमातून जालना येथे १५९ हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणार असून भूसंपादनाचे काम संपले असून आता संपादित जागेवर संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

* देशभरात १२ बंदरे आहेत. जेएनपीटी, मुंबई, कांडला, कोलकाता, हल्दिया, परद्वीप, विजाग, चेन्नई, तुतिकोरिन, कोचीन, न्यू मंगलोर, गोवा, याशिवाय काही खाजगी पोर्टवरूनही पाठविला जातो.

* तसेच मुंद्रा, पिपाव, दिघी, इन्नोरे, गंगावरण आणि वल्लारपम येथूनही माल पाठविला जातो. नव्याने ४ पोर्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे. यात हाजीरा, रिवास, सागरबंदर, व्हिजिंझम, येथे उभारले जाणार आहे.

[ जालना येथे ड्रायपोर्टची उपयोगिता ]

* दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प निर्माण होत आहे. तर प्रस्तावित भागात उद्योग वाढतील, तसेच सध्या या ठिकाणी नऊ उत्पादक क्लस्टर आहेत. ४८ औद्योगिक वसाहती आहेत.

* दोन आयटी पार्क आहेत. तसेच १५ एसईझेड मंजूर झाले आहेत. मराठवाड्यात ऑटोमोबाईल कंपनींना मोठा वाव असल्याने येथे गाड्यांचे उत्पादन वाढेल. कोल्डस्टोरेज चेन विकसित झाल्यास यांच्या माध्यमातून कृषी उत्पादन मालाची निर्यात करता येईल.

* कंटेनर यार्ड - ड्रायपोर्टमधील ११.५ हेक्टर जमीन यार्ड कंटेनरसाठी ठेवली जाणार आहे. निर्यातीच्या मालाचे कंटेनर स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

* गोदामापर्यंत रेल्वे रूळ असेल. माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज असेल. हवाई वाहतुकीपासून आणि रेल्वे स्टेशनपर्यंत यांचा चांगला फायदा होऊ शकतो.

* ड्रायपोर्टसाठी एकूण ८६३ कोटी रुपये भांडवली खर्च येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४५८
कोटी, दुसऱ्या १९० कोटी, तिसऱ्या २१४ कोटी रुपये खर्च येणार आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.