सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

५.२ पंचायत समिती

५.२ पंचायत समिती 

पंचायत समितीचे स्वरूप व रचना 

* त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेमध्ये पंचायत समिती हा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा असतो.

* साधारणपणे प्रत्येक तालुका हा विकास गट मानलेला असतो. प्रत्येक विकास गटासाठी पंचायत समिती असते. महाराष्ट्रात सध्या ३५१ पंचायत समित्या आहेत.

[ रचना ]

* तालुका किंवा विकास गटातून लोकांनी प्रत्यक्षरित्या निवडलेले सभासद पंचायत समितीत असतात. त्यांची संख्या साधारणपणे त्या विकास गटावर जिल्हापरिषदेवर निवडून गेलेल्या सभासदांच्या दुप्पट असते.

* अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव असतात. इतरमागासवर्गीयांसाठी २७% आणि स्त्रियांसाठी १/३ जागा राखीव असतात.

* पंचायत समितीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. अकार्यक्षमता, जबाबदारी पार पाडण्यासाठी गैरकारभार, भ्रष्टाचार अशा कारणावरून राज्यशासनाला पंचायत समिती बरखास्त करता येते.

सभापती व उपसभापती 

* सभापती व उपसभापती हे पंचायत समितीचे पदाधिकारी असतात. पंचायत समितीतील लोकनियुक्त सदस्य आपल्यामधून त्याची निवड करतात.

* सभापती व उपसभापती यांच्याविरुद्ध पंचायत समितीला अविश्वासाचा ठराव मांडता येतो. मात्र त्यासाठी सहयोगी सदस्य वगळता इतरसदस्यांपैकी १/३ सदस्यांनी तशी मागणी करावी लागते.

सभापतींची कार्ये 

* सभापती हा पंचायत समितीच्या सभेचा अध्यक्ष असतो. तसेच पंचायत समितीवर विविध कार्यावर देखरेख ठेवतो. समितीने केलेले ठराव व घेतलेले निर्णय यांची प्रशासनाकडून योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल ते पाहतो.

* सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती हा सभापतींची कार्ये पार पडतो.

गटविकास अधिकारी 

[ स्वरूप ]

* गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख आणि सचिव असतो. घटकराज्य प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी किंवा द्वितीय श्रेणीतील तो अधिकारी असतो.

* त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. गटविकास अधिकाऱ्याच्या जागा पदोन्नतीने काही प्रमाणात भरल्या जातात.

* जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यातून त्या भरल्या जातात. तसेच जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी याचे गटविकास अधिकाऱ्यावर नियंत्रण असते.

गटविकास अधिकाऱ्याचे कार्ये 

* पंचायत समितीच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख या नात्याने विविध कार्यावर तो देखरेख ठेवतो. कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे कार्यकारी अधिकार त्याला असतात.

* पंचायत समितीच्या कार्यालयाचा तो प्रमुख असतो. त्याच्या हाताखालील कर्मचाऱ्याकडून आवश्यक ती माहिती, अहवाल, हिशेब तो मागवू शकतो.

* पंचायत समितीचा सचिव या नात्याने पंचायत समितीच्या सभांना तो उपस्थित राहतो व सभांच्या कामकाजाचे इतिवृत्तांत तयार करतो.

* पंचायत समितीच्या स्थायी समितीचाही तो सचिव असतो. पंचायत समितीतीला मिळणाऱ्या अनुदानातील रकमांचा विनियोग करण्याचे अधिकार त्याला असतात.

पंचायत समितीची कार्ये 

* गटातील विकास योजनांचा आराखडा तयार करणे व जिल्हापरिषदेची मान्यता घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे.

* जिल्हापरिषदेने सोपविलेली विकास योजनांची कार्ये पार पाडणे.

* ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख ठेवणे व नियंत्रण ठेवणे.

* पंचायतीचे समितीचे वेगळे कर नसतात. जिल्हापरिषदेकडून पंचायत समितीकडे जी विकासाची कार्ये सोपविली जातात. त्यांचा खर्च जिल्हापरिषदेतून दिला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.