बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

जीएमआरटीने मंगळावरील संदेश टिपला - २०१६

जीएमआरटीने मंगळावरील संदेश टिपला  - २०१६

* युरोपियन स्पेस एजन्सीच्या [ESA] रोव्हरने मंगळावरून पाठवलेला रेडिओ संदेश पुण्याच्या रेडिओ म्हणजे जीएमआरटीन टिपला आहे. जीएमआरटी म्हणजे [ जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ]. पुण्यातील नारायणगावजवळ खोडद येथे जीएमआरटी आहे.

* ईएसएच यान आज मंगळाभोवती कक्षेत पाठविण्यात आले. या यानान छोटा रोव्हर मंगळावर उतरवण्याचा प्रयत्न केला. या महत्वाच्या टप्प्यावर रोव्हरचा पृथ्वीशी संपर्काचा मार्ग म्हणून जीएमआरटीची भूमिका महत्वाची ठरली. रोव्हर मंगळावर उतरताना त्यानं पाठविलेला पहिला संदेश जीएमआरटीनेच टिपला.

* जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिणींपैकी एक आहे. नासा, इस्रो, यांच्यासारख्या मोठ्या अंतराळ संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती.

* जीएमआरटी उद्या साडेचार वाजता पुण्यातील आयुकामध्ये मार्सरोव्हरकडून आलेल्या संदेशाची माहिती देणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.