शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

विमान क्षेत्रातील [ उडान ] योजनेला सरकारची मंजुरी - २०१६

विमान क्षेत्रातील [ उडान ] योजनेला सरकारची मंजुरी - २०१६

* विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने ' उडे देश का आम नागरिक ' या घोषणेसह प्रादेशिक संपर्क योजना - RCH म्हणजेच उडानचा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे.

* जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचा विमान प्रवास अवघ्या दोन हजार पाचशे रुपयात शक्य होणार आहे.

* नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू व राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिल्लीत ' उडाण ' योजनेची घोषणा केली. यांच्या म्हणण्यानुसार ' हवाई चप्पल ' घालणाऱ्या माणसांनाही हवाई प्रवास घडविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

* या योजनेत देशातील प्रमुख राज्यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वाधिक रुची दाखवत उडान या योजनेत केंद्राशी दोन महिन्यापूर्वीच करार केला आहे.

* राज्यातील १० शहरे पहिल्या टप्प्यात या योजनेचा रडार वर घेण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीसह, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव या शहरांचा समावेश केला आहे.

[ उडान योजनेची वैशिट्ये ]

* विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न

* प्रादेशिक विमानसेवेतील अर्धी तिकिटे सवलतीत त्यासाठी सरकारकडून अंशदान

* त्याबदल्यात देशांतर्गत विमानसेवेच्या तिकिटावर अधिभार आकारण्यात येईल.

* २३५० ते ५१०० रुपये प्रतीआसन अंशदान तीन वर्षासाठी मिळणार.

* २०३२ पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या ३० कोटी करण्याचे उद्दिष्ट.

* पुढील वर्षांपासून जानेवारी २०१७ पासून या योजनेची अंमलबजावणी होणार.

* महाराष्ट्रसह देशातील प्रगत राज्यांचा समावेश.

* २५०० रुपये एका तासाच्या विमानप्रवासाचे तिकीट

* महाराष्ट्रातील १० शहरांना लाभ

* १५० किमी अंशदानासाठी आवश्यक अंतर

* ३० ते ४० विमानामधील आसनक्षमता 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.