शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

नगरपंचायत व कटक मंडळे

नगरपंचायत व कटक मंडळे 

नगरपंचायत स्वरूप 

* १९९३ साली करण्यात आलेल्या ७४ घटनादुरुस्तीमध्ये ज्या ग्रामीण क्षेत्राचे शहरीकरण होत आहे त्याच्यासाठी नगरपंचायत असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

* त्यानुसार महाराष्ट्रात पाच ठिकाणी नगरपंचायती आहेत. कणकवली, दापोली, शिर्डी, मलकापूर, केज इत्यादी.

* दहा हजारापेक्षा जास्त आणि पंचवीस हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि शहरीकरण होत असलेल्या भागासाठी नगरपंचायत स्थापन करता येईल.

* त्या क्षेत्रात किमान ५०% शेतीव्यतिरिक्त लोक इतर व्यवसायात करणारे असावेत. ते क्षेत्र ' अ ' वर्ग नागरपरिषदेपासून किमान २५ किमी दूर असावे.

नगरपंचायतीची रचना

* नगरपंचायतीची सदस्यांची संख्या १७ असते. त्यांची निवड नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी प्रत्यक्षरित्या करतात.

* निवडणुकीसाठी नगरपंचायत क्षेत्राचे प्रभाग पाडले जातात. प्रत्येक भागातून एक नगरसेवक निवडला जातो.

* अनुसूचित जाती व जमाती यांना त्यांच्या लोकसंख्यप्रमाणात इतर मागासवर्गीय यांना २७% आणि स्त्रियांसाठी ५०% जागा राखीव असतात.

* ठरविलेल्या क्रमानुसार नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्गीय आणि स्त्रियासाठी ५०% राखीव असतात.

पदाधिकारी, कार्यकाळ, प्रशासन 

* अध्यक्ष व उपाध्यक्ष हे नगरपंचायतीचे पदाधिकारी असतात. त्यांची निवड नागरपंचायतीचे सदस्य असतात.

* नगरपंचायतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. गैरकारभार अकार्यक्षमता या कारणावरून राज्य सरकारला ती बरखास्त करता येते.

* नगरपंचायतीच्या प्रमुख प्रशासकाला कार्यकारी अधिकारी असे म्हणतात. त्यांची नेमणूक राज्य शासन यांच्यामार्फत MPSC मार्फत होते.

* नगरपंचायतीची कार्ये व अधिकार ' क' वर्ग नगरपरिषदेप्रमाणे असते.

कँटोन्मेंट बोर्ड / कटक मंडळ 

* ज्या ठिकाणी लष्करी छावणी असते. तिथे वास्तव्य करणाऱ्या लष्करातील अधिकारी, सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच त्या भागात वेगवेगळ्या कारणाने वास्तव्यास असलेले इतर लोक यांना दैनंदिन सोई सुविधा पुरविण्यात कटक मंडळ असते.

* भारतात एकूण ६२ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात पुणे कॅम्प, औरंगाबाद, कामठी नागपूर, देवळाली नाशिक, अहमदनगर, देहू, खडकी अशी एकूण ७ कटक मंडळे आहेत.

* लष्करी छावणीचे क्षेत्र शहराला लागून असले तरीही ते शहराची नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. ते लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असते.

कटक मंडळाची रचना 

* लष्करी छावणी क्षेत्रातील लोकसंख्येनुसार प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी, असे कटक मंडळाचे प्रकार पडतात. आणि त्या प्रमाणात कटक मंडळाची सभासद - संख्या ठरते.

* प्रथम श्रेणीत कटक मंडळात पंधरा सदस्य असतात. त्यात पदसिद्ध सदस्य, नियुक्त सदस्य तसेच निर्वाचित सदस्य असतात.

* छावणीचा प्रमुख अधिकारी हा कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तसेच छावणीचा आरोग्य अधिकारी छावणीचा कार्यकारी अभियंता हे पदसिद्ध सभासद असतात.

* कार्ये - लष्करी छावणीतील सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्ये करावे लागते.

* उत्पन्नाची साधने - लष्करी छावणी क्षेत्रात राहणाऱ्या लोकांवर कर आकारण्याचा आणि तो वसूल करण्याचा अधिकार या मंडळाचा असतो. त्याचबरोबर छावणी क्षेत्रातील विविध योजनांसाठी, कार्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळतो. तेच मंडळाच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असते.

* कटक मंडळाचा कारभार केंद्रीय जनरल ऑफिसर कमांडर इन चीफ [COC in C ] या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली चालतो.

* मंडळाने आकारलेले कर किंवा त्याने केलेल्या खर्चात तरतुदी यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांची मंजुरी आवश्यक असते.

7 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.