बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी - २०१६

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी - २०१६

* ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प ८ हजार ४१६ रुपये खर्चाचा आहे. तर स्वामी समर्थनगर विक्रोळी मेट्रो प्रकल्प हा ६ हजार कोटी रुपयाचा आहे.

* अशा रीतीने एकूण १५ हजार ८८ कोटी रुपयाच्या दोन प्रकल्पाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत.

* कल्याण मेट्रोवर १७ स्थानके अनुक्रमे कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोगेगाव एमआयडीसी, राजणोली गाव, टेमघर, गोपालनगर, भिवंडी, धामकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कषेशी, बाळकूम, कापूरवाडी यांचा समावेश असून हा मार्ग २४ किमी असेल.

* समर्थनगर विक्रोळी मेट्रोच्या मार्गावर एकूण १७ स्थानके असतील अनुक्रमे स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली, गुंफा, सिपझ, साकी विहार मार्ग, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी या स्थानकांचा सामावेश असेल, हा मार्ग १४.५ किमीचा असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.