सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

५.३ ग्रामपंचायत

५.३ ग्रामपंचायत 

ग्रामपंचायतीचे स्वरूप व रचना 

* ग्रामपंचायत हा पंचायत व्यवस्थेचा सर्वात अखेरचा आणि सर्वात महत्वाचा स्तर आहे.

[ रचना ]

* ग्रामपंचायतीची स्थापना पंचायतराज व्यवस्था अमलात येण्यापूर्वी कितीतरी आधी म्हणजे ब्रिटिश काळातच झालेली होती.

* साधारणतः प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावाची किमान लोकसंख्या ६०० असावी लागते.

* त्यापेक्षा कमी लोकसंख्या असल्यास एकाहून अधिक गावासाठी एकच ग्रामपंचायत स्थापन केली जाते. महाराष्ट्रात २७ हजार ९०६ ग्रामपंचायती आहेत.

* ग्रामपंचायतीचे सदस्य - संख्या गावाच्या लोकसंख्येनुसार ७ ते १७ एवढी असते. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच असे म्हणतात. त्यांची निवड प्रौढ मताधिकार पद्धतीने गावातील लोक करतात.

* त्यासाठी गावाचे प्रभाग पाडलेले असतात. प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन पंचाची निवड होते. स्त्रियांसाठी १/३ जागा राखीव असतात.

* इतर मागासवर्गीयांसाठी २७% जागा राखीव असतात. गावातील अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रमाणात काही जागा राखीव असतात. त्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असतो.

कार्यकाळ 

* ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. अधिकारांचा गैरवापर, अकार्यक्षमता, कर्तव्यपालनता, या कारणावरून राज्यशासनाला ग्रामपंचायत बरखास्त करता येते.

* बरखास्तीची निर्णय घेताना जिल्हा परिषदेचा निर्णय घेतला जातो तसेच विचारविनिमय केला जातो. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला आपले स्पष्टीकरण देण्याची संधी दिली जाते.

* याचबरोबर ग्रामपंचायतीतील एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या झाल्या असतील तर राज्यशासनाला ती ग्रामपंचायत बरखास्त करता येते.

* बारखास्तीनंतर सहा महिन्याच्या आत तिच्या निवडणूक घ्याव्या लागतात.

सरपंच व उपसरपंच 

* ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्यातून सरपंच व उपसरपंच यांची निवड करतात. ही पदे अनुसूचित जाती जमाती, इमाव, मागासवर्गीय, स्त्रिया यांच्यासाठी ठरलेल्या क्रमानुसार राखीव असतात.

* ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषविणे व सभेचे कामकाज नियमानुसार चालविणे, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवणे.

* ग्रामसभेची बैठक बोलाविणे व त्याचे अध्यक्षस्थान स्विकारणे ही सरपंचाची कार्ये आहेत. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच हा सरपंचाचा कार्यभार स्वीकारणे.

ग्रामपंचायत बडतर्फी 

* सरपंच व उपसरपंच यांना बडतर्फ करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला असतो. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या किमान एक तृतीयांश सभासदांनी अविश्वाच्या ठरावाची नोटीस तहसीलदारांकडे द्यावी लागते.

* तहसीलदार त्यानंतर सात दिवसाच्या आत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाला तर संबंधित पदाधिकारी बडतर्फ होतो, मात्र सरपंच किंवा उपसरपंच पदावर महिला असेल तर अविश्वासाचा ठराव ३/४ बहुमताने मंजूर व्हावा लागतो.

* सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत अविश्वाचा ठराव आणता येत नाही. तसेच अविश्वाचा ठराव नामंजूर झाल्यास पुन्हा एक वर्षापर्यंत तसा ठराव मांडता येत नाही.

ग्रामसभा 

* गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांची मिळून ग्रामसभा बनते. महाराष्ट्रात सन १९५८ च्या ग्रामपंचायत कायद्यानेच ग्रामसभेची स्थापना केलेली आहे.

* ७३ व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये ग्रामसभेसंबंधी तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामपंचायत कायद्यामध्ये ग्रामसभेची रचना व तिचे अधिकार यासंबंधी तरतुदी केल्या आहेत.

* ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान ६ वेळा भरविणे आवश्यक असते. सरपंच हा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो.

* सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असतो. ग्रामसभेच्या दोन बैठकीदरम्यान तीन महिन्यापेक्षा जास्त काळ असू नये.

* ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष असते ] या दोन महिन्याच्या आत घेतली पाहिजे.

* आवश्यकता वाटल्यास जिल्हापरिषदेची स्थायी समिती, पंचायत समिती किंवा जिल्हापरिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामसभेची बैठक बोलावू शकतो.

ग्रामसभेचे कामकाज 

* ग्रामपंचायतीला आपले वार्षिक अंदाजपत्रक ग्रामसभेला सादर करावे लागतात. मागील वर्षातील कामाचा अहवाल सादर करावा लागतो.

* मागील वर्षाच्या जमाखर्चावरील लेखापरीक्षणाची टिपणे व त्याला दिलेली उत्तरे सादर करावी लागतात.

* ग्रामपंचायतीच्या सर्व कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ग्रामसभा कार्य करू शकतो.

ग्रामसेवक 

* ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी ग्रामसेवक असतो. तो जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्यातील तृतीयश्रेणीतील सेवक असतो.

* त्याची नेमणूक किंवा बढती जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडून केली जाते. तसेच त्याचे वेतन जिल्हा परिषदेकडून दिले जाते.

[ ग्रामसेवकाची कामे ]

* ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामपंचायतीचे दैनदिन कामकाज पाहणे.

* ग्रामपंचायतीचे केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीचने केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

* ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाची नोंद ठेवणे. तिचे अहवाल व हिशेबपत्रके पंचायत समितीला सादर करणे.

* ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाची नोंद ठेवणे. तिचे अहवाल व हिशेबपत्रके पंचायत समितीला सादर करणे.

* ग्रामपंचातीच्या सभेला उपस्थित राहून सभेचे इतिवृत्त लिहिणे.

* ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.

ग्रामपंचायतीची कामे 

* गावपातळीवरील पंचायत राज्यव्यवस्थेतील तळाचा घटक म्हणून ग्रामपंचायत याला काम पाहावे लागते.

* शेतीसंबंधित सर्व माहितीचे गावकर्यांना मार्गदर्शन आणि जमीन लागवडीखाली कसे आणणे यासंबंधी मार्गदर्शन करणे.

* पशुसंवर्धन, जंगले, समाजकल्याण यांच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे. दारूबंदी, अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी उपाय योजने. अपंग निराधार रुग्ण यांना साहाय्य करणे.

* सार्वजानिक ठिकाणांची स्वछता राखणे, दिवाबत्तीची सोय करणे, रस्त्यांची साफसफाई, क्रीडांगने, बागा तयार करणे.

* जलसिंचन, कुटीरउद्योग, ग्रामोद्योग, यांना उत्तेजन देणे आणि त्यांचे संवर्धन करणे.

* नियमित कार्ये - जन्ममृत्यूची नोंद ठेवणे, विवाहाची नोंद ठेवणे, गावाच्या विकास योजनांचा आराखडा तयार करणे, यात्रा व बाजार इत्यादींवर नियंत्रण ठेवणे.

ग्रामपंचातीवरील नियंत्रणे 

* ग्रामपंचायतीची सर्वे कामे व दस्तऐवज, अहवाल, जमाखर्च अशी कोणतीही कागदपत्रे जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती मागवू शकते.

* जिल्हा परिषद व पंचायत समितीने नियुक्त केलेले अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयातील कारभार तपासू शकतात.

* मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्याने नियुक्त केलेला अधिकारी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची तपासणी करू शकतो.

* गैरकारभार, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, कर्तव्यपालनातील निष्क्रियता, पंचायत समितीने दिलेल्या आदेशांची पालन करण्यातील कसूर या कारणावरून राज्यशासन जिल्हापरिषदेशी विचारविनिमय करून अशी ग्रामपंचायत बरखास्त करू शकते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.