शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी [ महामेट्रो ] ची स्थापना - महाराष्ट्र राज्य २०१६

राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी [ महामेट्रो ] ची स्थापना - महाराष्ट्र राज्य २०१६

* समान विकास धोरणांतर्गत राज्यातील सर्व मेट्रोरेल्वे प्रकल्पासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन [ महामेट्रो ] या कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे सर्व प्रकल्पाच्या उभारणीमध्ये वेळ आणि बचत करण्यावर जादा भर देण्यात येणार आहे.

* पुणे मेट्रो रेल्वेच्या उभारणीचे काम सध्या तरी नागपूर मेट्रोला दिले असले तरीही, पुढे सर्व मेट्रो भविष्यात महामेट्रोचा हिस्सा बनणार आहेत. महामेट्रोमुळे तिकिटांचे दर कमी राहतील त्याचा फायदा प्रवाशांना होणार.

* साधारणपणे ३ ते ४ आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच कंपनीची स्थापना होणार आहे. त्यानंतर मुंबई पुणे नागपूर मेट्रो महामेट्रोशी संलग्न होतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.