सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर - २०१६

अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर - २०१६

* ' कॉन्ट्रॅक्ट थिअरी ' बद्दल क्रांतिकारी संशोधन करणारे ब्रिटिश अर्थतज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलँडचे अर्थतज्ञ बेंट होमस्ट्रॉंग यांना यावर्षीचा अर्थशास्त्र विभागाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

* त्यांच्या संशोधनामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदावरील व्यक्तींचे वेतन इतकेच नव्हे, तर तुरुंग व्यवस्थापन सुकर झाले आहे. तसेच दिवाळखोरीची संबंधीत आणि राजकी
य धोरणाचा पाया यांच्या संशोधनामुळे घातला  गेला आहे.

* कराराचे स्वरूप त्याची व्याप्ती विशद करून त्याचा आकृतिबंध समोर मांडण्याचे काम कॉन्ट्रॅक्ट थिअरी करते. कराराच्या विविध पद्धती व आकृतिबंध का असतात हे उलगडून सांगणे या थिअरीचा उद्देश आहे. कामाच्या स्वरूपानुसार वेतन व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजकीकरण अशा अनेक गोष्टीसाठी या सिद्धांताचा उपयोग होतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.