बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

WEF च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारत ३९ व्या स्थानावर - २०१६

WEF च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारत ३९ व्या स्थानावर - २०१६

* व्यापार उद्योग यांच्यासाठी अनुकूल असलेल्या देशामध्ये भारताच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या वर्षी सुधारणा होऊन भारत जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत १६ स्थानांनी सुधारणा होऊन भारत ३९ व्या स्थानावर आला आहे.

* १३८ देशांच्या यादीत दक्षिण आशियायी देशामध्ये पाकिस्तान सर्वात शेवटच्या १२२ व्या स्थानावर आहे. श्रीलंका ७१, नेपाळ ९८, भूतान ९७, बांगलादेश १०६ स्थानावर आहे.

* २०१५-१६ मध्ये भारत ५५ व्या स्थानावर होता तर एकूण १२ मुद्दे विचारात घेऊन जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकाची क्रमवारी ठरवली जाते. यात उद्योगाच्या नव्या संकल्पना, आधुनिकीकरण, वस्तू बाजारपेठ, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि अन्य मुद्यांचा समावेश आहे.

* जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात ब्रिक्स देशामध्ये चीन पाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे. चीनला २८ वे स्थान मिळाले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.