मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

MPSC कर सहायक प्रश्नपत्रिका भाग १ - २०१६

MPSC कर सहायक प्रश्नपत्रिका भाग १ - २०१६

१] '' तू जो कुडता मला दिलास, तो मी घातला आहे. '' यातील गौण व मुख्य वाक्यांचे परस्पर रूपांतर केल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय मिळेल?
१] मी घातलेला कुडता, तू घातलेला आहेस. २] तू घातलेला कुडता मी घातला आहे. ३] मी जो कुडता घातला आहे, तो तू मला दिला आहेस. ४] मी घातला आहे तो कुडता तू दिला आहेस.

२] सुवाच्छ याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही?
१] गिचमिड २] दुर्बोध ३] अवाचनीय ४] अर्वाच्य

३] ' ज्याच्या हाती ससा तो पारधी ' यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे?
१] सामान्य २] संबंध दर्शक ३] पुरुषवाचक दर्शक ४] संबंधी व सामान्य

४] वक्त्याच्या भाषणात तर्कसंगती आणि संदर्भ यांचा अभाव श्रोत्यांना कळलाच नाही. मात्र अतिशय आवेशपूर्ण असे त्यांचे भाषण झाले. अध्यक्षांनी समारोप करताना ' यांच्या विद्वात्तेची मी काय पावती देणार '? यामधून त्यांनी काय सुचविले?
१] वक्ते अतिशय विद्वान आहेत २] त्यांच्या विद्वात्तेचे मोजमाप करणे कठीण आहे ३] भाषणातून विद्वात्तेचा अभाव श्रोत्यांना कळलाच आहे ४] मूल्यमापन करण्यास अध्यक्ष पात्र नाहीत

५] भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा?
१] वसन २] अरी ३] अली ४] तनुज

६] ऐकणे या क्रियापदापासून कर्तृत्ववाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?
१] ऊ २] रा ३] आ ४] णारा

७] विधिनिषेध नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ?
१] काय करावे, काय करू नये, याचा अजिबात विचार नसणे २] कायद्याने प्रतिबंध नसणे ३] एखाद्या विधीस आडकाठी नसणे ४] कायद्यास प्रतिबंध नसणे

८] सेलची जाहिरात वाचून हौसेने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळ्यातली किमती माळ गर्दीत चोरीला गेली, बहिणीने विचारले - 'केवढ्याला झाली ही खरेदी _ _ _ _ ?
या वाक्यानंतर रिकाम्या जागी कोणते विराम चिन्ह येऊ शकते?
१] पूर्णविराम व प्रश्नचिन्ह २] प्रश्नवाचक व उदगारवाचक चिन्ह ३] स्वल्पविराम व पूर्णविराम ४] पूर्णविराम व उद्गारवाचक चिन्ह

९] तुणतुणे वाजविणे हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो?
१] एखादी व्यक्ती महत्वाच्या कामात मदत करीत असेल २] एखादी व्यक्ती आपली आवडती गोष्ट श्रोते कंटाळले तरी वारंवार सांगत असेल तर तेव्हा ३] एखादी गोष्ट जशीच्या तशी पुनरावृत्त होत असेल, त्यावेळी ४] मोठ्या कामात आपला सहभाग असेल तेव्हा

१०] 'आधणातले रडतात आणि सुपातले हसतात' म्हणजे काय?
१] प्रत्येकासोबत ज्याचे त्याचे दैव असते २] आज सुखात आहेत, ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टिनियम आहे.
३] ओल्याबरोबर सुकेही जळते ४] हसणे रडणे प्रत्येकाच्या स्थितीवर अवलंबून असते.

११] ' उधारीचे पोते सवा हात रिते', ही महान काय सुचविते?
१] उधारी अंतिमतः नुकसानीत नेते. २] उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात ३] उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते ४] उधारीने मरेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच

१२] ' सुज्ञान अधिक सांगणे न लगे.' या वाक्यात क्रियापदाचा प्रकार ओळखा?
१] अनियमित २] शक्य ३] प्रयोजक ४] भावकृतक क्रियापद

१३] शुद्ध शब्द कोणता?
१] औद्योगिकरण २] उद्योगीकरण ३] औद्योगिकरण ४] उद्योगीकरण

१४] ' टिटवी देखील समुद्र आटवते.' या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचवणारी म्हण पुढीलपैकी कोणती?
१] थेंबे थेंबे तळे साचे २] भित्यापाठी ब्रह्मराक्षस ३] सरड्याची धाव कुपापर्यंत ४] कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटाची तट्टानी

१५] पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत?
१] गिरी, पर्वत, नग २] डोंगर, नभ, खग ३] नग, शिखर, खग ४] नभ, अद्री, खग

१६] वसंतरावांनी बॅंकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची सेवा देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली. पुढे ती कंपनीचं बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले. म्हणतात ना - - -- -- ? रिकाम्या जागी कोणती म्हण वापरता येईल.
१] असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ २] आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते ३] जगी सर्वसुखी असा कोण आहे? ४] धर्म करता कर्म उभे राहते

१७] 'जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा?
१] कर्तरी २] कर्मणी ३] भावे ४] कर्तू - कर्म संकर

१८] ''तुम्ही म्हणाला तर आम्ही देखील नाटकाला येऊ.'' या वाक्यातील कोणते अव्यय आले आहे?
१] क्रियाविशेषण २] साधित शब्दयोगी अव्यय ३] शुद्ध शब्दयोगी अव्यय ४] केवल प्रयोगी अव्यय

१९] ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत?
१] स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजूत २] घर, स्वीकार, समजूत ३] इमारत, समजूत, पृथ्वी ४] घर, सूर्यमालेतील गोल, स्वीकार

२०] '' निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा '' हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे?
१] आज्ञार्थी २] विध्यर्थी ३] उद्गारार्थी ४] संकेतार्थी

२१] ' अर्धामुर्धा ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
१] पूर्णाभ्यस्त २] अंशाभ्यस्त ३] अनुकरणवाचक ४] सामासिक

२२] '' तो मोठा मतलबी मनुष्य आहे. त्याच्या - - - - -  - हे चांगले? रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल?
१] वाऱ्यावर सोडणे २] वाटेस जाणे ३] वाऱ्यास उभे न राहणे ४] वाटेस लावणे

२३] उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
१] य, ता २] ई, त्व ३] ई, पणा ४] य, ई

२४] ' दशभुजा ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
१] द्वंद्व २] कर्मधारय ३] तत्पुरुष ४] बहुव्रीही

२५] '' साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते '' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर पुढीलपैकी कोणते असेल?
१] किती संवेदनशील होते साने गुरुजी! २] साने गुरुजी खूपच संवेदशील होते! ३] साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते ना? ४] साने गुरुजी किती संवेदनशील होते?

२६] खालील म्हणीचा योग्य अर्थ लावा? '' उथळ पाण्याला खळखळाट फार ''
१] मुळातच काही नाही मग नसत्या उठाठेवी कशाला. २] अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज. ३] ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो. ४] मुळातच पाण्याचा थेंब नाही तेथे पाण्याचा आवाज कोठून येणार

२७] '' आर्थिक वाढ पाच टक्क्यावरून आठ टक्क्यावर नेण्यासंबंधी रघुराम राजन यांचे मत प्रतिकूल होते.'' या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात आणता येईल?
१] विरोधी २] वेगळे ३] अनुकूल ४] भिन्न

२८] पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास बारा वाटा या म्हणीतून काय व्यक्त होते?
१] पळवणाऱ्याच्या मर्यादा २] चोरवाटेच्या मर्यादा ३] शोधकार्याचे सामर्थ्य ४] चोरीची सुलभता व शोधाची कठीणता
 
२९] '' समारंभास नागरिक [ मोठी संख्या ] ने उपस्थित होते '' - कंसातील शब्दांचे कोणते रूप येथे योग्य ठरेल?
१] मोठ्या संखे २] मोठ्या संख्या ३] मोठी संख्या ४] मोठ्या संख्ये

३०] पर्यायी उत्तरातील ' नकारार्थी वाक्य ' ओळखा.
१] एकादशीची गर्दी फार मोठी असते २] एकादशीची गर्दी ही लहानसहान नव्हे ३] एकादशीची गर्दी केवढी आहे ही ४] एकादशीची केवढी आहे नाही गर्दी

३१] '' सातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो. '' या वाक्यातील उद्देश कोणते?
१] सातपुडा परिसर २] होळी ३] होळीच्या आठ दिवस आधी ४] भोंगऱ्या बाजार

३२] ' तपोधाम ' हि संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल?
१] तप + धाम २] तप: + धाम ३] तपो + धाम ४] तप + उधाम

३३] पुढीलपैकी कोणत्या शब्दास विविध अर्थ नाहीत?
१] अर्थ २] अर्क ३] अर्ध ४] अलंकार

३४] '' माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. '' अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे?
१] उद्देश २] उद्देश विस्तार ३] कर्मपूर्वक विस्तार ४] विधेय विस्तार

३५] पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये प्रायोजक क्रियापद आहे?
१] मला अजिबात पहाटे लवकर उठवत नाही. २] संतांना लोकांचे दुःख पाहवत नव्हते ३] ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, अशी आख्यायिका आहे ४] दिवसभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शेवटी त्याला बोलवेना


उत्तरे - १] ३, २] ४, ३] २, ४] ३, ५] ३, ६] ४, ७] १, ८] २, ९] २, १०] २, ११] १, १२] १, १३] ४, १४] ३, १५] १, १६] २, १७] ३, १८] ३, १९] १, २०] २, २१] २, २२] ३, २३] १, २४] ४, २५] १, २६] ३, २७] ३, २८] ४, २९] ४, ३०] २, ३१] ४, ३२] २, ३३] ३, ३४] ३, ३५] ३,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.