शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

MPSC कर सहायक प्रश्नपत्रिका भाग ३ - २०१६

MPSC कर सहायक प्रश्नपत्रिका भाग ३ - २०१६

१] ७८ भागाची रामायण ही मालिका दूरदर्शनवर सर्वप्रथम कधी प्रसारित झाली?
१] १९८५-८६ २] १९८९-९० ३] १९८२-८३ ४] १९८७-८८

२] सी डी देशमुखाबद्दलची पुढील विधाने सत्य की असत्य ते ओळखा ?
१] हे केंद्रीय अर्थमंत्री होते २] हे संसदेत कुलाबा मतदारसंघातून गेले होते. ३] यांनी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात न झाल्यास निषेधार्थ राजीनामा दिला.
१] १,२,३ सर्व सत्य आहेत २] १,२,३ सत्य नाहीत ३] १ व २ सत्य ३ असत्य ४] १ व ३ सत्य व २ असत्य

३] १९५४ साली जेव्हा राज्यसभा सदस्य लीलावती मुन्शी यांनी ' सिनेमामुळे तरुण बिघडतात ' असा दावा केला, तेव्हा - - - - - - - - - या अभिनेत्याने व राज्यसभा सदस्याने,' ऊन व सावली सोबतच असतात असे प्रत्युत्तर दिले?
१] राज कपूर २] पृथ्वीराज कपूर ३] दिलीप कुमार ४] देव आनंद

४] - - - - - - च्या शहरी भागातील साम्यवादी आणि समाजवादी स्त्रियांनी भाववाढी विरुद्ध चळवळ १९७३-७५ मध्ये सुरु केली होती?
१] महाराष्ट्र २] केरळ ३] मद्रास ४] मध्यप्रदेश

५] - - - - - -- जे अस्पृश्यते विरुद्धचे योध्ये होते, ज्यांनी ' राम राज्य ' हा चित्रपट अर्धवट पहिला होता, त्यांना ' अछूत कन्या ' चित्रपटाचे निर्माते त्यांचा चित्रपट पाहण्यास आणू शकले नाहीत?
१] डॉ आंबेडकर २] महात्मा गांधी ३] विठ्ठल रामजी शिंदे ४] जयप्रकाश नारायण

६] संस्थानिकांशी त्यांच्या तनख्याबाबत बोलणी करून त्यानंतर संसदेत संस्थानिकांचे विशेष हक्क रद्द करणारे विधेयक - - - - - -  या गृहमंत्र्यांनी मांडले?
१] वल्लभभाई पटेल २] यशवंतराव चव्हाण ३] गुलझारीलाल नंदा ४] लाल बहादूर शास्त्री

७] मुफ्ती महमंद सय्यद, भारताचे - - - - -  - होते, त्यांची मुलगी डॉ रुबाया सईद हिचे जम्मू काश्मीर मुफ्ती संघटनेचे श्रीनगर येथे अपहरण केले?
१] अर्थमंत्री २] संरक्षण मंत्री ३] विदेश मंत्री ४] गृह मंत्री

८] ऑकटोम्बर १९८८ मध्ये ज्याचे जुन्या जनता पक्षाचे विलीनीकरण होऊन जनता दल अस्तित्वात आले तो ' जन मोर्चा ' कोणी स्थापन केला होता?
१] एन टी रामाराव २] व्ही. पी. सिंग ३] मोरारजी देसाई ४] चरण सिंग

९] विजोड गोष्ट ओळखा :
१] अप्सरा २] आर्यभट्ट ३] ध्रुव ४] कामिनी

१०] सन १९५५ च्या बांडुंग परिषदेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता?
१] फ्रँकलिन रुझवेल्ट, लाल बहादूर शास्त्री, नासेर २] नेहरू, नासेर, चौ एन - लाय ३] विन्स्टन चर्चिल, राजेंद्र प्रसाद, बॅरिस्टर जिना ४] क्लेमेंट अटली, माओ त्से तुंग, नेल्सन मंडेला

११] महाराष्ट्राचे नवे औद्योगिक धोरण - - - - - - - रोजी जाहीर करण्यात आले?
१] १ नोव्हेंबर २००६ २] १ नोव्हेंबर २००७ ३] १ नोव्हेंबर २००८ ४] १ नोव्हेंबर २००५

१२] महाराष्ट्राच्या विधानावर खालील विधानावर चर्चा करा आणि कोणते विधान बरोबर आहेत ते सांगा?
१] मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे २] अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे.
१] १ बरोबर २ चूक २] १ चूक २ बरोबर ३] दोन्ही बरोबर ४] दोन्ही चूक

१३] पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?
१] २३ तास ५६ मिनिटे ४.०९ सेकंद २] २३ तास ५५ मिनिटे ५९.०९ सेकंद ३] २३ तास ५५ मिनिटे ४९.०९ सेकंद ४] २३ तास ५६ मिनिटे ०.०९ सेकंद

१४] कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात?
१] वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. २] अंजना, गिरणा, मांजरा. ३] प्रवरा, मुळा, शिवना ४] पूर्णा, दुधना, दारणा
१] १ फक्त २] २ आणि ४ ३] ३ व १ ४] फक्त ४

१५] खालीलपैकी वृष्टीची रूपे सांगा?
१] पाऊस २] रिमझिम ३] हिमवृष्टी ४] ढग
१] १ २] १ आणि ४ ३] १,२,३ ४] ३ व ४

१६] महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही?
१] चंद्रपूर २] यवतमाळ ३] गोंदिया ४] नांदेड

१७] खालील विधाने पहा
१] प्रत्येक रेखावृत्ताची लांबी २०,००० किमी आहे.
२] विषुववृत्तावर दोन रेखावृत्तावर अंतर १०१ किमी आहे
३] भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेच्या ५ तास ३० मिनिटांनी मागे आहे.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
१] १ २] २ ३] १ आणि २ ४] २ आणि ३

१८] सह्यांद्री पर्वतांच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास - - -  - - - पठारी प्रदेश असे म्हटले जाते?
१] महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार २] बुलढाणा पठार व औंध पठार ३] सासवड पठार व खानापूर पठार ४] अग्निजन्य पठार
१] १ २] २ आणि ३ ३] ३ आणि ४ ४] ४ फक्त

१९] महाराष्ट्राच्या २०११ सालच्या जणगणप्रमाणे खालील जिल्ह्यांचा उच्च लिंग गुणोत्तर उतरता क्रम लावा?
१] गोंदिया, सिन्धुदुर्ग, रत्नागिरी २] गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ३] सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया ४] रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया

२०] महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून - उत्तरेकडे क्रमाने लावा?
१] विजयदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग २] जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग ३] सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा ४] सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा

२१] महाराष्ट्रातील ग्रामपंचायतबद्दल खालील विधाने विचारात घ्या?
१] मागासवर्गीय उमेदवार सर्वसाधारण [ बिगर राखीव ] असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असतो.
२] सर्वसाधारण [ बिगर राखीव ] जागेवर निवडून आलेली मागासवर्गीय व्यक्ती मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असतो.

२२] संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना - - - - - - रोजी स्वीकारली.
१] ९ डिसेंबर १९४६ तिच्या पहिल्या बैठकीत २] २२ जानेवारी १९४७ जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारल्या गेला. ३] २२ जुलै १९४७ ४] १४ ऑगस्ट १९४७

२३] खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे.
२] मुख्यमंत्री हा राज्यशासनाचा प्रमुख आहे.
३] सचिव हा राज्याचा प्रशासकीय प्रमुख आहे.

२४] जोड्या लावा
१] अनुच्छेद १४     १] अस्पृश्यतेची समाप्ती
२] अनुच्छेद १६     २] संधीची समानता
३] अनुच्छेद १७     ३] पदव्यांची समाप्ती
४] अनुच्छेद १८     ४] कायद्यासमोर समानता
१] २,४,१,३ २] २,४,३,१ ३] ४,२,३,१ ४] ४,२,१,३

२५] खालील विधाने विचारात घ्या.
१] जर राज्यपालांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार अथवा अन्य मार्गाने राष्ट्रपतींचे समाधान झाले की राज्यशासन राज्यघटनेनुसार चालत नाही तर ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.
२] राष्टपतीचे समाधान म्हणजेच केंद्र सरकारचे समाधान
३] राष्ट्रपती राजवट ही प्रत्यक्षात केंद्र सरकारची राजवट असते.
४] राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाने अनुच्छेद ३५६ हे वगळण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
१] १,२,३ बरोबर २] २,३,४ बरोबर ३] १ व २ बरोबर ४] १,२,३,४ बरोबर

२६] विधानपरिषद खालीलपैकी कोणते विधान बरोबर व चूक नाहीत ते सांगा?
१] सर्वसाधारणपणे म्हटले जाते की, एकूण सभासद संख्येच्या ५/६ सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जाते.
२] १/६ सदस्य हे राजपालाद्वारा नामनिर्देशात केले जातात.
३] राज्यपालांना नामनिर्देशात बाबत न्यायालये प्रश्न प्रस्थापित करू शकतात.
१] १ २] २ ३] ३ ४] १ आणि ३

२७] मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देशित राज्यांना दिले आहेत?
१] कलम ४१ २] कलम ४४ ३] कलम ४७ ४] कलम ५१

२८] खालील तलाव व जिल्ह्यांचा योग्य जोड्या लावा.
१] आंदरा        १] परभणी
२] आळंद        २] वाशीम
३] वारूळ        ३] पुणे
४] पांगरी         ४] नांदेड
१] १,२,३,४ २] २,३,१,४ ३] ३,१,४,२ ४] ४,२,१,३

२९] खालीलपैकी कोणाचा ' पिळवणुकीचा विरुद्ध हक्कात ' समावेश होत नाही?
१] मानवी व्यापारास प्रारंभ २] अस्पृश्यता निवारण ३] वेठबिगारास प्रतिबंध ४] मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामास प्रतिबंध

३०] ९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल हॉल मध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता - - - -  - म्हणतात?
१] संसदीय ग्यानपीठ २] पार्लमेंट हाऊस चा सेंट्रल हॉल ३] पार्लमेंट हाऊस अनेक्स ४] लोकसभा चेंबर

३१] राष्ट्रपती - - - - - - सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधीशाची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात?
१] पंतप्रधान २] उपराष्ट्रपती ३] विविध मंत्री ४] वरीलपैकी एकही नाही

३२] विधानसभा बाबत पुढील विधाने विचारात घ्या?
१] महाराष्ट्रात अनुसूचित जमातीसाठी २९ जागा या राखीव आहेत.
२] अरुणाचल प्रदेश ६० पैकी ५९ जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
३] नागालँड मध्ये सर्व जागा अनुसूचित जमातीसाठी राखिव आहेत.
४] उत्तर प्रदेशात अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नाही.
१] १,२ बरोबर २] २,३ बरोबर ३] १, ४ बरोबर ४] २, ४ बरोबर

३३] खालील पैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यावर पंतप्रधान बनले होते?
१] मोरारजी देसाई २] चरण सिंग ३] व्ही पी सिंग ४] पी व्ही नरसिंगराव ५] देवेगौडा
१] १,३,४ २] १,२,५ ३] १,२,३,५ ४] १,२,३,४,५

३४] खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] राज्यपाल पदाचा ठरलेला कार्यकाळ पाच वर्षाचा आहे, परंतु तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर पद धारण करतात.
२] राष्ट्रपतींच्या मर्जीबाबत न्यायालयात दाद मागता येत नाही.
३] राज्यपालांना पदाची सुरक्षितता नाही, त्यांना राष्ट्रपती पदावरून कोणत्याही क्षणी हटवू शकतात.
४] राज्यघटेने काही करणे सांगितली आहेत, ज्यावरून राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून हटवू शकतात.

३५] खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] मूलभूत कर्तव्यांची संख्या आता अकरा आहे.
२] मूलभूत कर्तव्यांचा समावेश १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे करण्यात आला.
३] मूलभूत कर्तव्ये अनुच्छेद ५१ मध्ये समाविष्ट आहेत.
४] राज्यघटनेत यापैकी कोणत्याही कर्तव्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तरतूद नाही.

३६] खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधने हा राहिला?
१] नववी २] दहावी ३] अकरावी ४] बारावी

३७] राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या?
१] त्याची नेमणूक राष्ट्र्पतींद्वारे फेब्रुवारी २००० मध्ये करण्यात आली होती.
२] ११ सदस्यांसह त्याचे प्रमुख एम एन व्यंकट हे होते.
३] त्याचा अहवाल ३१ मार्च २००२ रोजी सादर करण्यात आला.
४] त्याने २४९ शिफारसी केल्या होत्या.
१] १,२,३ बरोबर २] २,३,४ बरोबर ३] १,२,३,४ बरोबर ४] फक्त १ आणि २ बरोबर

३८] नियोजनाकरिता साधनसामुग्रीची उभारणी करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता वित्त उभारणीचा प्रमुख अंतर्गत स्रोत आहे?
१] परदेशी मदत २] सार्वजनिक कर्ज ३] कर आकारणी ४] विदेशी भांडवल

३९] खालीलपैकी कोणाचे भारतीय ' राज्यघटनेचा आत्मा ' असे वर्णन केले जाते?
१] मूलभूत हक्कांवरील प्रकरण २] मार्गदर्शक तत्वावरील प्रकरण ३] उद्देशपत्रिका ४] न्यायालयीन पुनर्विलोनासंबंधी तरतुदी

४०] गरिबी हटाव [ दारिद्र्य निर्मूलन ] ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
१] तिसऱ्या २] चौथ्या ३] पाचव्या ४] सहाव्या

४१] जून २०१६ मध्ये भारतीय नौदलाच्या जपान आणि अमेरिकेच्या नौदलाबरोबर एक्सर्साइजच्या मलाबार - २०१६ ची - - - - -  आवृत्ती पार पडली.
१] १६ वी २] १९ वी ३] २० वी ४] २२ वी

४२] तेजस काय आहे?
१] रणगाडा २] रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र ३] लढाऊ विमान ४] उपग्रह

४३] २०१६ मध्ये ' पदमविभूषण ' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
१] अनुपम खेर २] सायना नेहवाल ३] यामिनी कृष्णमूर्ती ४] विनोद रॉय

४४] मे - जून २०१६ मधील भारत सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट सिटी आव्हान स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतातील किती शहरांची निवड करण्यात आली?
१] १० २] २० ३] ५० ४] १००

४५] नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला आहे?
१] टी एस सुब्रम्हण्यम कमिटी २] अशोक दलवाई समिती ३] जे एस राजपूत समिती ४] सुधीर मंकड समिती

४६] भारत सरकारने - - - -  - - साली निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाची [PFRDA] यांची स्थापना केली?
१] २०१३ २] २००३ ३] २००६ ४] २००७

४७] २०१५ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त मनोज कुमार यांच्या बाबतीत खालील कोणते विधान बरोबर नाही?
१] त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी आहे.
२] त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे ज्यात त्यांनी नायक ' भारत ' म्हणून भूमिका केल्या, त्यांना भारत हे टोपण नाव मिळाले.
३] शिर्डी मधील पिंपळगाव रस्त्याचे ' मनोज कुमार गोस्वामी मार्ग ' असे नामकरण करण्यात आले?
४] बेईमान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.

४८] सुनील लांबा यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] नौदल प्रमुख म्हणून नेमणूक झाली.
२] त्यांनी आर के धवन यांची जागा घेतली.
३] ते भारतीय नौदलाचे २३ वे भारतीय म्हणून २१ वे प्रमुख बनले.
४] ते पदमभूषण पुरस्कार प्राप्त आहेत.

४९] २०१५ च्या अमेरिकन [ सर्कल टेनिस ] स्पर्धेतील सानिया मिर्झाच्या विजयाचे वैशिष्ट्ये काय?
१] मार्टिना हिंगीस समवेत महिला दुहेरी विजयी.
२] अंतिम सामन्यात ५७ मिनिटात विजय.
३] या विजयाबरोबर ४७९ मानांकन गुणांची कमाई.
४] महिला दुहेरी जगात अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.

५०] महाराष्ट्राच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन - वन विकास योजनेचा कोणता उद्देश नाही?
१] अनुसूचित जमातीचे कल्याण आणि सामाजिक आर्थिक विकास साधने
२] व्याघ्र प्रकल्प व भोवतालच्या बफर झोनमधील गावांचा सर्वसमावेशक विकास करणे.
३] मानव आणि वन्य प्राणी यातील संघर्ष कमी करणे. 
४] गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे.

५१] दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थीना पाच कोटी एल. पी. जी जोडणी दिली जाते जाणारी योजना कोणती?
१] उजाला २] उजवला ३] उन्नती ४] उदय

५२] संरक्षण उत्पादन आणि विकास संघटनेने अलीकडेच जून २०१६ मध्ये - - -  - - - जगदीशचंद्र बोस प्रगत तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासंबंधी सामंजस्य करारावर सह्या केल्या?
१] जादवपूर विद्यापीठ २] ओ पी जिंदाल जागतिक विद्यापीठ ३] बिर्ला तंत्रज्ञान आणि शास्त्र संस्था ४] टाटा मूलभूत संशोधन संस्था

५३] ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा?
१] जगात सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली राणी २] ११६ जणांना भेटी ३] जगातील अधिकतम देशाच्या नाण्यावर त्यांची प्रतिमा आहे.
१] १ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १ आणि ३ बरोबर ४] १, २ ३ बरोबर

५४] मैत्री धारणाची बाबतच्या विधानांचा विचार करा?
१] हे धरण अफगाणिस्तान बांधले आहे २] भारताने ते हरिरुड नदीवर १,७०० कोटी खर्च करून बांधले आहे. ३] त्याचे पूर्वीचे नाव सलमा धरण आहे ४] ते भारत व अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतीक झाल्याने त्याचे मैत्री धरण असे पुनः करण नामकरण करण्यात आले.
१] १ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १,२,४ बरोबर ४] वरील सर्व

५५] घनकचरा व्यवस्थापन ' वेंगुर्ला पॅटर्न ' बाबतच्या विधानांचा विचार करा?
१] तो वेंगुर्ला नगरपालिका राबवत असलेला ' पथदर्शी प्रकल्प ' आहे.
२] संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रम यूएनडीपी संस्थेकडून त्यांची प्रशंसा झाली आहे.
३] ओला, सुका, प्लॅस्टिक व काच धातूकचरा अशा घनकचऱ्याचा चार प्रकारच्या विभागणीवर तो आधारित आहे.
४] प्लस्टिक कचऱ्याच्या संकलनासाठी वेळ ६ ते १० रात्री आहे.
१] १ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १ आणि ४ बरोबर ४] वरील सर्व

५६] २६ जानेवारी २०१६ पासून लागू झालेल्या नव्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील ऍट्रॉसिटी तरतुदीचा विचार करा?
१] ६० दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करणे
२] सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना केली
३] बलात्कार पीडित महिलांना आर्थिक सहाय्य देणे
४] पीडितांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ७ दिवसाच्या आत आर्थिक मदत देणे.
१] केवळ १ आणि २ २] केवळ १ आणि ३ ३] केवळ १ आणि ४ ४] वरील सर्व

५७] संयुक्त राष्ट्र १८८ देशांच्या मानवी विकास दर्शक मापन २०१५ नुसार अनुक्रमे पहिले चार सर्वोत्तम देश आहेत?\
१] नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क
२] ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क
३] स्वित्झर्लंड, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क
४] नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, स्वित्झर्लंड

५८] पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार - २०१५ प्रदान करण्यात आला, ते आहेत - - - - ?
१] शशी कपूर व हेमा मालिनी २] अनिल कपूर व शेखर सुमन ३] प्रेम चोपडा व शशी कपूर ४] अनिल कपूर व म्हैसूरचे महाराज यदुवीर चामराज वाडियार

५९] भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात [MTCR ] - - - -  - -पूर्ण सदस्य बनला आहे?
१] ३५ वा २] ३८ वा ३] ४९ वा ४] २१ वा

६०] ' ग्रामन्यायालया ' मागील उद्दिष्टांचा विचार करा?
१] न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण २] जलद न्याय ३] स्वस्त न्याय ४] कमी मनस्ताप व त्रास
१] १ आणि २ बरोबर २] २ आणि ३ बरोबर ३] १ आणि ४ बरोबर ४] वरील सर्व बरोबर

उत्तरे - १] ४, २] १, ३] २, ४] १, ५] २, ६] २, ७] ४, ८] २, ९] २, १०] २, ११] १, १२] २, १३] १, १४] १, १५] ३, १६] ३, १७] १, १८] १, १९] ४, २०] ३, २१] ३, २२] ३, २३] ३, २४] ४, २५] १, २६] ३, २७] ३, २८] ३, २९] २, ३०] २, ३१] ४, ३२] ४, ३३] ४, ३४] ४, ३५] ३, ३६] ३, ३७] ३, ३८] ३, ३९] ३, ४०] ३, ४१] ३, ४२] ३, ४३] ३, ४४] २, ४५] १, ४६] २, ४७] ३, ४८] ४, ४९] ४, ५०] १, ५१] २, ५२] १, ५३] ४, ५४] ४, ५५] ४, ५६] ४, ५७] १, ५८] ३, ५९] १, ६०] ४. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.