सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये खुला - २०१६

जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये खुला - २०१६

* भव्य दिव्य काही वस्तू व कार्य हे चीनचे समीकरणच बनले आहे, मोठी लोकसंख्या, भूप्रदेश,यामुळे चीनचे बांधकामही मोठे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

* चिनी अभियंत्यांनी जगातील सर्वात उंच पुलाचे बांधकाम पूर्ण केले असून तो काल खुला करण्यात आला.

* डोंगराळ भागातील नदीवर बांधलेल्या या पुलाचे नाव ' बेईपायजींग ' असे आहे, गुझू प्रांताच्या खोऱ्यातील या पुलाची उंची ५६५ मीटर [ तब्बल १८८४ फूट ] आहे.

* म्हणजेच २०० मजली इमारतीएवढी एवढा उंच पूल तो जगातील सर्वात उंच पूल ठरला असून या पुलाने हुबेई प्रांतातील सी दु नदीवरील पुलाला मागे टाकून जगातील सर्वात उंच पूल असण्याचा मान पटकाविला आहे.

* झेझियांग प्रांताच्या हांगझू या शहराचा महामार्ग आणि गुझू प्रांतातील रुली शहरातील जोडणाऱ्या या पुलाचे काम २०१३ मध्ये सुरु करण्यात आले होते.

* या पूल उभारणीवर एक अब्ज येन म्हणजेच १५ कोटी डॉलर एवढा खर्च झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.