शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

४.४ उपविभागीय अधिकारी

४.४ उपविभागीय अधिकारी 

* उपविभागीय अधिकारी हा उपविभागाच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. जिल्हाधिकाऱ्याला नियंत्रणाखाली त्याचे कार्य चालते.

* उपविभागीय अधिकारी पदावर नेमणूक राज्य सरकारडून होते. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्याची अनुभव घेण्यासाठी या पदावर नेमणूक केली जाते.

* तसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाते. उपविभागीय अधिकारी हा राजपत्रित अधिकारी असतो.

भूमिका 

* जिल्ह्याच्या उपविभागाच्या प्रशासनाची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यावर असते. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागाचा कामाचा ताण कमी करण्यासाठी उपविभाग नेमले जातात आणि त्यावर उपविभागीय अधिकारी म्हणून एकाची निवड केली जाते.

* यासाठी जिल्ह्याचे उपविभाग निर्माण करून उपविभागातील प्रकरणे निकालात काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आहे.

* जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर काम करणारे तहसीलदार, नायब तहसीलदार, इतर अधिकारी, यांच्यामधला उपविभागीय अधिकारी हा दुवा असतो.

* जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्य करतो. त्याचबरोबर तालुक्यातील कनिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या साखळीतील तो मधला घटक असतो.

उपभागीय अधिकारी कार्ये व जबाबदाऱ्या 

* जिल्ह्याच्या उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखणे.

* तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुक्यातील इतर अधिकारी यांच्या कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

* शासनाच्या आदेशांची उपविभागात अंमलबजावणी करणे.

* तहसीलदाराने जमिनीच्या वादात निकाल देणे व निर्णयाची अंलबजावणी करणे.

* जमिनीच्या नोंदी अचूक असल्याची खात्री करून घेणे व त्याबाबत येणाऱ्या तक्रारींचे दाखल घेऊन त्याबाबत निर्णय देणे.

* दुष्काळी परिस्थितीत उपविभागातील लोकांना महसुलाबाबत सूट देण्याची शिफारस करणे.

* कुळकायदा, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, भाडे नियंत्रण कायदा अशा बाबतीत जे वाद निर्माण होतात त्या वादात निकाल देणे.

* रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, सुक्षिक्षित बेरोजगार अशा मदत असणाऱ्या कल्याणकारी कार्याचे उपविभागीय स्तरावर पर्यवेक्षण करणे.

* करमणूक कर वसुली, महसुली वसुली, स्वस्त धान्य दुकान यांची तपासणी करणे.

* विधानसभा निवडणुकीच्या काळात उपविभागाचा निवडणूक अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तो कार्य करतो.

* उपविभागाचा ' मुख्य प्रशासक ' या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क ठेवणे व उपविभागातील प्रशासनाबद्दलची माहिती पुरविणे. 

2 टिप्पणी(ण्या):

  1. तहसीलदार न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर उपविभागीय अधिकारी स्थगिती देऊ शकतात का ? आणि देऊ शकतात तर मामलेदार अधिनियम १९०६ कलाम २३ ( २) काय आहे .

    उत्तर द्याहटवा
  2. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जर एखाद्यास चुकिने रक्कम अदा झाली असल्यास ती वसूल करण्याचे अधिकार त्याना स्वताला असतात का ?

    असल्यास ते कशी अमंलबजावणी करतात ?

    उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.