मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी अहवाल - २०१६

फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी अहवाल - २०१६

* जगातील ५०० मोठ्या कंपन्यात भारताच्या एकूण ७ कंपन्यांचा सहभाग आहे.

* फॉर्च्युन या मासिक संस्थेने जगातील ५०० मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार भारताच्या एकूण ७ कंपन्याचा त्या यादीत समावेश आहे.

* या यादीत अमेरिकेची प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्ट ही प्रथम क्रमांकावर आहे.

* या यादीत चीनची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी स्टेट ग्रीड दुसऱ्या, चायना नॅशनल पेट्रोलियम तिसऱ्या, चीन की पेट्रोलियम रिफायनरी कंपनी साईनोपेक चौथ्या, नेदरलँड्सची रॉयल डच शेल ही पाचव्या स्थानावर आहे.

* या सूचित भारताची इंडियन ऑइल १६१ व्या स्थानावर, रिलायंस इंडस्ट्रीज २१५ व्या स्थानावर, टाटा मोटर्स २२६ व्या स्थानावर, स्टेट बँक ऑफ इंडिया २३२ व्या स्थानावर, भारत पेट्रोलियम ३५८ व्या स्थानावर, हिंदुस्थान पेट्रोलियम ३६७ व्या स्थानावर, राजेश एक्स्पोर्ट ४२३ व्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.