शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

चालू घडामोडी ४ ते १० सप्टेंबर - २०१६

चालू घडामोडी ४ ते १० सप्टेंबर - २०१६

* देशातील पहिले इन्होवेशन हब महाराष्ट्राच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात निर्माण होणार आहे.

* चीनमधील हॉंगजू येथे जी - २० परिषद आयोजित केली होती त्यात वाढत आर्थिक बचाव वाद, आर्थिक स्थिती, पर्यावरण बदल, नवप्रवर्तन, जागतिक व्यापाराचा विस्तार, सर्वसमावेशक वाढ, यावर चर्चा करण्यात आली.

* जगाची आई संबोधल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांना [ संत ] ही पदवी बहाल करण्यात आली त्यांनी आपले कार्य गरिबांसाठी वेचले.

* युनेस्कोच्या २०१६ च्या शिक्षणविषयक अहवालात भारत हा विकसीत देशाच्या ५० वर्षे पिछाडीवर आहे.

* ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या कोलंबो येथील स्टेडियमवर टी २० चा २६३ धावसंख्येचा विश्वविक्रम झाला.

* व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे तसेच अनुक्रमे दिल्ली एनसीआर, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आहे.

* बहुप्रतीक्षित आयफोन ७ हा लॉन्च झाला असून तो आतापर्यंतच्या तंत्रज्ञानाचा बादशहा ठरणार आहे त्याची किंमत ४७ हजार ते ७९ हजार रुपये एवढी आहे.

* भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छतेच्या अहवालात देशातील सर्वात स्वच्छ राज्य सिक्कीम आणि अनुक्रमे केरळ, हिमाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड ही राज्ये आहेत. तसेच या अहवालांतर्गत देशातील सर्वात स्वछ जिल्हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग असून अनुक्रमे बंगालचा नदिया, सातारा, पूर्व मिदनापूर, कोल्हापूर हा जिल्हा आहे.

* वस्तू व सेवा कराला १७ राज्यांची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रपतींची त्याला मंजुरी मिळाली आहे. तर आता हे विधेयक २०१७ च्या एप्रिलपासून लागू करण्यात येईल.

* केंद्र सरकारने सुरु केलेली उज्वल डिस्कॉम अशुरन्स [उदय] ही योजना भारतातील १६ राज्यात लागू करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याने अजून यात सहभाग घेतला नाही. ही योजना केंद्र सरकारने २०१५ साली सुरु केली आहे.

* क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी ने जाहीर केलेले विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीत भारतातील एकही संस्था नाही, सलग पाचव्या वर्षी अमेरिकेच्या मॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी या विद्यापीठाने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे.

* संशोधन क्षेत्रात जगात जी १०० विद्यापीठे आहेत त्यात केवळ भारतातील चार संस्थांना स्थान मिळाले आहे.

* प्रख्यात इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी गुगल हि ' भारत सेव्ह ' या नावाची वेबसाईट तयार करणार आहे. त्यावर भारतातील वित्तीय नियोजनाची सर्व माहिती असेल.

* आधार या योजनेचे प्रमुख म्हणून जे सत्यनारायण यांनी सूत्रे स्वीकारली आहे.

* सतीश धवन अवकाश केंद्र ' जीएसएलव्ही - एफ ०५ ' या हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले, या उपग्रहामुळे भारताला हवामानाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.